मुंबई - पोलिसांच्या मारहाणीत तरुणाच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी 2 पोलीस अधिकारी आणि ३ कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंबधित मुंबई झोन ४ चे सौरभ त्रिपाठी यांनी आदेश दिले आहेत. विजय सिंह (वय 26 रा. अंटोफील), असे मृत तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप; मुंबईत कुटुंबीयांची निदर्शने
पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्यावर मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी वडाळा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. सकाळपासून पोलीस ठाण्यासमोर लोकांचा जमाव आहे आणि पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती. आमदार तमील सेलव्हन आणि खासदार राहुल शेवाळे यांनी देखील पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आंदोलनात दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा - अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
त्यानुसार आज (मंगळवारी) मुंबई झोन ४ चे डीसीपी सौरभ त्रिपाठी, स्थानिक आणि कुटुंबीय यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यात डीसीपी त्रिपाठी यांनी 2 पोलीस अधिकारी आणि 3 कॉन्स्टेबल यांचे निलंबन केलेले आहे, तर आता 5 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने आंदोलन मागे घेण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात येत आहे.