मुंबई - मुलुंड-गोरेगाव रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास ट्रकने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये टेम्पोमधील दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठाण्यात बसच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
पिकअप टेम्पो काचा घेऊन पूर्व द्रुतगती मार्गावरून मुलुंडच्या दिशेने जात होता. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर नाहुर ब्रिजजवळ पिकअप टेम्पोला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे टेम्पो उलटला. तसेच गाडीमधील काचांचा रस्त्यावर सडा पडला. यामध्ये जखमी झालेल्या दोघांना त्वरित पालिकेच्या मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लातूर : टिप्परची दुचाकीला धडक ; माय- लेकाचा जागीच मृत्यू
दरम्यान, या घटनेमुळे मुलुंड गोरेगाव लींक रोडवर काचांचा सडा पडला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. वाहतूक पोलिसांनी पालिका कर्मचार्यांच्या मदतीने या काचा रस्त्यावरून हटवल्या. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.