मुंबई - पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने अंधेरी परिसरातून 2 ड्रग पेडलरला अटक केली. पेडलर्सकडून 160 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत, जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 16 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.अब्दुल्ला इक्बाल शेख (वय-29) आणि अल्ताफ अब्दुल रहमान शेख (वय-44) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी अल्ताफ शेखवर एकूण 14 गुन्हे मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. बलात्कार प्रकरणात आरोपी जामिनावर सुटला आहे. तर आरोपी अब्दुल्ला अल्ताफकडून अनेक ठिकाणी एमडी ड्रग्स पुरवत असे. दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांनी पुढील तपास सुरू केला.
हेही वाचा - माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांचे कुठे हनीमुन चालले आहेत? - अमृता फडणवीस