महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल की, आर्थिक दिशाभूल अहवाल? - पृथ्वीराज चव्हाण
मुंबई - आज महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल २०१८-१९ सभागृहामध्ये सादर केला गेला. या अहवालातील परस्पर विसंगत आणि फुगवलेली आकडेवारी सादर करून महाराष्ट्र शासनानेदेखील केंद्रातील मोदी सरकारप्रमाणे हातचलाखी केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. वाचा सविस्तर -
मुंबईतील पदवी अभ्यासक्रमाची पहिली मेरिट लिस्ट नव्वदीपार, विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळणे होणार कठीण
मुंबई - विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या ८०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील पदवीच्या प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट सोमवारी जाहीर झाली. यात मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये एफवायची पहिली मेरिट लिस्ट नव्वदीपार पोहोचली आहे. यामुळे मुंबईतील शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळणे कठीण होणार आहे. वाचा सविस्तर -
दुष्काळाचा दाह: प्यावं लागतंय रेल्वे डब्याच्या शौचालयातील पाणी
औरंगाबाद - राज्यात भीषण दुष्काळ असून सरकार सर्वांना टँकरने पुरवठा होत असल्याचा दावा करत आहे. मात्र, औरंगाबादेमध्ये पाण्यासाठी होणारी कसरत पाहिल्यावर हा दावा किती खरा आहे? हे कळते. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या गरिबांवर चक्क रेल्वेत स्वच्छतागृहात वापरण्यात येणारे पाणी चोरून भरण्याची वेळ येत आहे. वाचा सविस्तर -
मिरज शासकीय रूग्णालयाचा अनागोंदी कारभार, प्रसूतीनंतर नवजात अर्भकासह महिलेला झोपवलं जमिनीवर
सांगली - मिरज शासकीय रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला नवजात अर्भकासह जमिनीवर झोपावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोनाली गाडे, असे या प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. वाचा सविस्तर -
रत्नागिरीत ९ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, एकाला अटक
रत्नागिरी - शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजी स्टेडिअममध्ये ९ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नराधम विकास विठ्ठल पवार याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. वाचा सविस्तर -