ETV Bharat / state

Dance Bar in Mumbai बारच्या आत खास बांधलेल्या पोकळीतून 17 महिलांची सुटका; 25 ग्राहकांना अटक - 17 Women Rescued From bar

बंदी असतानाही छुप्या पद्धतीने डान्स बार सुरू ( dance bar in Dahisar ) असल्याचा प्रकार समोर आला आहे. दहिसर पोलिसांनी कारवाई ( Dahisar police action on bar ) केली आहे.

डान्स बार
डान्स बार
author img

By

Published : Dec 18, 2022, 9:21 AM IST

मुंबई: मुंबईतील दहिसर भागातील एका रेस्टॉरंट-कम-बारवर ( restaurant cum-bar in Dahisar area ) छापा टाकण्यात आला. यावेळी अनेक महिलांची पोकळीतून सुटका करण्यात आली. तर काही महिला नाचताना आढळल्या, असे एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.

दहिसर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी झालेल्या छाप्यात व्यवस्थापकासह रेस्टॉरंटमधील 19 ग्राहक आणि सहा कर्मचाऱ्यांना ( 19 customers and six staff ) अटक करण्यात आली. आम्हाला डान्स फ्लोअरवर चार महिला सापडल्या. तर अशा छाप्यांमध्ये पोलिसांना चकवा देण्यासाठी 17 महिला खास बांधलेल्या पोकळीत ( specially built cavity in bar ) लपल्या होत्या. त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना निघून जाण्याची परवानगी देण्यात आली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 308 (दोषी हत्येचा प्रयत्न) अंतर्गत महिलांना पोकळीत लपवून ठेवल्याबद्दल तसेच अश्लीलतेशी संबंधित इतर गुन्ह्यांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

२००३ पासून राज्यात डान्स बारवर बंदी -महाराष्ट्रात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी २००५ साली डान्स बारवर बंदी आणली होती. मात्र, २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठवली होती. त्याविरोधात २०१४ मध्ये राज्य शासनाकडून आदेश काढत बारवर पुन्हा बंदी घालण्यात आली. मात्र, २०१५ मध्ये ही बंदी असंवैधानिक असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्याचा आदेश दिला होता. महाराष्ट्र राज्यात पहिला डान्सबार रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये १९८० साली सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पुणे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई सह राज्यात शेकडो ठिकाणी डान्स बार सुरू करण्यात आले होते. नेपाळ, बांगलादेश मार्गे तरुणी मुंबईसह इतर शहरात येऊन डान्स बारमध्ये काम करू लागल्या जिथे महिन्याला १० हजाराहून अधिक रुपये बारबाला कमवत असे.

कसे वाटले जातात पैसे -डान्स बारमध्ये काम करणाऱ्या बारबाला डान्स बारच्या प्रसिद्धीनुसार पैसे कमवित असतात. बारमध्ये येणाऱ्या एखाद्या ग्राहकाने एखाद्या बारबालेवर पैसे उधळले असता, त्या एकूण पैशांपैकी ६० टक्के रक्कम संबंधित बारबालेला मिळत असते. सुंदर दिसणाऱ्या बारबाला महिन्याला जवळपास १ ते ३ लाख रुपये कमवित असल्याचे डान्स बार मालकांचे म्हणणे आहे.

मुंबई शहरात होते ७०० डान्स बार -डान्स बारवर २००५ साली बंदी येण्याअगोदर एकट्या मुंबई शहरात ७०० डान्स बार चालविले जात होते. बंदी आल्यानंतर या ७०० डान्स बार पैकी ३०७ डान्स बार बंद होऊन उर्वरित डान्स बार अनधिकृतरित्या सुरू होते. यांच्या माध्यमातून दीड लाख नागरिकांना रोजगार मिळत होता. ज्यात ७५ हजार बारबालांचा समावेश होता. २०१३ साली बारबालांचा हाच आकडा २० हजारावर जाऊन बसला ज्यात बहुतेक बारगर्ल ह्या गाण्याचे व वेटरचे काम करीत आहेत. सध्या मुंबईत इंडियाना, ड्रमबीट सारखे केवळ ३ डान्स बार परवानाधारक असून इतर डान्स बार छुप्या पद्धतीने चालविले जात आहेत. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयानंतरही डान्स बार मालाकांनी डान्स बार सुरू करण्यासाठी उत्सुकता दाखवलेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.