मुंबंई - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज राज्यात 150 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रातील एकूण आकडा तब्बल 1 हजार 18 वर पोहोचला आहे. आज 12 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 64 झाली आहे. यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष्य महाराष्ट्राकडे लागले आहे. पुण्यातील अनेक भागांना बंद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज एकट्या मुंबईमध्ये 118, पुण्यात 18, अहमदनगरमध्ये 3, बुलढाण्यात 2, ठाण्यात 2, नागपुरात 3, साताऱ्यात 1, औरंगाबादमध्ये 3, रत्नागिरीत एक आणि सांगलीत एक, असे 150 रुग्णांची वाढ झाली आहे.