मुंबई - राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या चर्चेचा विषय झाला आहे. विरोधी पक्ष भाजपाकडून या बदल्यांवरून राज्य सरकारवर टिका केली जात असताना आज पुन्हा 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या अधिकाऱ्यांच्या बदल्या -
1) सी के डांगे, संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई रिक्त पदावर.
2) ऐ आर काळे यांची नियुक्ती आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई या पदावर.
3)डॉक्टर एम.एस कळशेट्टी संचालक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे या पदावर.
4) डॉक्टर अश्विनी जोशी यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित मुंबई या पदावर.
5) प्रवीण दराडे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ मुंबई या पदावर.
6) पल्लवी दराडे यांची नियुक्ती सहसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई अपील व सुरक्षा या रिक्त पदावर.
7) जयश्री भोज यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई या पदावर.
8) महेंद्रवार भुवन यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा फुले जन आरोग्य योजना मुंबई या पदावर.
9) एच.पी तुम्मोड यांची नियुक्ती आयुक्त दुग्धविकास मुंबई या रिक्त पदावर.
10 आर.बी भोसले यांची नियुक्ती जिल्हाधिकारी अहमदनगर या पदावर.
11) डॉ के.एच कुलकर्णी, संचालक, नगर परिषद प्रशासन, मुंबई या पदावर.
13 आर.एस क्षिरसागर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर म्हणून नियुक्त केले आहे.
14 बी. बी. दांगडे यांना सचिव, शुल्क नियमितता प्राधिकरण, मुंबई हे पद देण्यात आले आहे.
15 आर.टी. गावडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे नियुक्ती करण्यात आली आहे.