ETV Bharat / state

राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांमधील 13 कैदी, 9 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये झालेला असून आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत 13 कैदी, तर 9 कारागृह कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

employee Death Number Prison Maharashtra
कारागृह कैदी कोरोनामुळे मृत्यू
author img

By

Published : Jun 1, 2021, 3:30 PM IST

मुंबई - दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये झालेला असून आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत 13 कैदी, तर 9 कारागृह कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - जीएसटीचा परतावा महाराष्ट्राला मिळावा यासाठी प्रयत्न करणार- रामदास आठवले

कारागृहातील कोरोना चाचणी वाढविण्यात आली

राज्यातील 47 कारागृहांमधील तब्बल 70 हजार 92 कैद्यांची कोरोना चाचणी आतापर्यंत घेण्यात आलेली असून यामध्ये 4 हजार 32 कैदी हे कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. यापैकी 3 हजार 800 कैदी हे उपचारानंतर बरे झाले असून दुर्दैवाने 13 कैद्यांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झालेला आहे. सध्याच्या घडीला 219 कैदी हे कोरोना संक्रमित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांतील कारागृह कर्मचाऱ्यांची सुद्धा कोरोना चाचणी घेण्यात आली असून आतापर्यंत 4 हजार 724 कारागृह कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 907 कारागृह कर्मचारी आतापर्यंत कोरोनाबाधित आढळले असून आतापर्यंत 844 कारागृह कर्मचारी हे उपचारानंतर बरे झाले आहेत. दुर्दैवाने 9 कारागृह कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असून 54 कारागृह कर्मचारी हे अद्यापही कोरोना संक्रमणामुळे उपचार घेत आहेत.

कारागृह आणि कैदी मृत्यू संख्या -

मुंबई मध्यवर्ती कारागृह - 1, तळोजा मध्यवर्ती कारागृह - 3, मुंबई महिला कारागृह - 1, येरवडा मध्यवर्ती कारागृह - 2, सोलापूर जिल्हा कारागृह - 1, धुळे जिल्हा कारागृह - 1, नागपूर मध्यवर्ती कारागृह - 3, अमरावती मध्यवर्ती कारागृह - 1.

कारागृह आणि कर्मचारी मृत्यू संख्या -

वाशिम जिल्हा कारागृह - १, अमरावती मध्यवर्ती कारागृह - 1, लातूर जिल्हा कारागृह १, बीड जिल्हा कारागृह - १, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह - १, विसापूर खुले कारागृह - १, येरवडा मध्यवर्ती कारागृह - १, तळोजा मध्यवर्ती कारागृह - 1, नाशिक येथील बोरसल कारागृह - १.

सध्याच्या घडीला राज्यातील 46 कारागृहांमध्ये तब्बल 34 हजार 281 कैदी ठेवण्यात आले असून यामध्ये 28 हजार 876 कच्चे कैदी तर इतर 5 हजार 405 शिक्षा झालेल्या कैद्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यभरात 2 हजार 869 कैद्यांना कोरोनाची लस देण्यात आलेली असून यामध्ये 2 हजार 93 कच्चे कैदी, तर 776 शिक्षा झालेल्या कैद्यांचा समावेश आहे. या बरोबरच राज्यातील 4 हजार 100 कारागृह कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 3 हजार 532 कारागृह कर्मचाऱ्यांना कोरोनाचीची लस देण्यात आलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 590 कैद्यांना पॅरोल

कोरोना संक्रमण अधिक पसरू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाच्या आदेशानंतर या संदर्भात कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याला अनुसरून 7 मे व 11 मे 2021 च्या हाय पावर कमिटीच्या सूचनेनुसार 522 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलेले असून, आपात्कालीन पॅरोलवर 68 कैद्यांना सोडण्यात आलेले आहे. आतापर्यंत 590 कैद्यांना कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात आलेले आहे.

हेही वाचा - प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ लावणे चुकीचे; देवेंद्र फडणवीस-शरद पवार यांच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.