ETV Bharat / state

राज्यात कोरोनामुळे 124 पोलिसांचा मृत्यू - महाराष्ट्र पोलीस कोरोना बातमी

राज्यात 11 हजार 773 पोलिसांचा कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे 124 पोलिसांचा मृत्यू झाला असून यामध्ये 11 पोलीस अधिकारी तसेच 113 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

file photo
file photo
author img

By

Published : Aug 13, 2020, 12:00 PM IST

मुंबई- कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यातील 11 हजार 773 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 1 हजार 221 पोलीस अधिकारी तर 10 हजार 552 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 124 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, यामध्ये 11 पोलीस अधिकारी तसेच 113 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सध्या राज्यात 2 हजार 233 पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. यात 278 पोलीस अधिकारी तर 1 हजार 955 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 9 हजार 616 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून यामध्ये 932 पोलीस अधिकारी तर 8 हजार 484 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 27 हजार 524 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 824 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. राज्यभरात 332 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 888 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे.

राज्यात, अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत 33 हजार 282 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 95 हजार 749 वाहने जप्त केली असून तब्बल 20 कोटी 46 लाख 05 हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे .राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 89 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 66 घटना घडलेल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.