ETV Bharat / state

कोरोना संकट : शिक्षण विभागाला अकरावी प्रवेश लवकर उरकण्याची लगीन घाई, प्रक्रियेमध्ये 'हे' नवे बदल - 11th online admission news

कोरोनाचा प्रादुर्भाव, लांबलेले शैक्षणिक वर्ष, यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर संपवणे आवश्यक आहे. यंदा सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार असून त्यासाठी १ जुलैपासून कॉलेजच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

11th online admission 2020-21 : some changes in eleventh online admission process
कोरोना संकट : शिक्षण विभागाला अकरावी प्रवेश लवकर उरकण्याची लगीन घाई, प्रक्रियेमध्ये 'हे' नवे बदल
author img

By

Published : Jun 24, 2020, 8:08 AM IST

मुंबई - कोरोनाचे सावट दिवसागणिक अधिक गडद होत आहे. अशात शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील अकरावीची ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया लवकर उरण्याची घाई शिक्षण विभागाला झाली आहे. मागील वर्षाच्या प्रवेशाचे ऑडिट अद्याप जाहीर न करता आणि दुसरीकडे दहावीचा निकाल लागणे दूर असतानाच, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत न्यायालयाने दिलेल्या अनेक सूचनांना डावलून, ही प्रवेश प्रकिया पूर्ण करण्यासाठी, अनेक प्रकारचे बदल करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

यात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश फेरीनंतर काही जागा शिल्लक राहिल्यास त्या भरण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राध्यान्य देण्याची फेरीही रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे मागील वर्षी देण्यात आलेल्या मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्या कमी करून हे प्रमाण १२ टक्के इतके करण्यात आले आहे. तर अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. हे प्रमाण आता चार टक्के करण्यात आले आहे. राज्यात यंदाही अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही मुंबई महानगर परिक्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे राबविण्यात येणार आहे. तर उर्वरित ठिकाणी ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या कॉलेजांच्या प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेऱ्या आयेाजित केल्या जातात. त्यानंतरही अनेक महाविद्यालयांमध्ये राहिलेल्या रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावरील फेऱ्या आणि यानंतरही राहिलेल्या विद्यार्थ्यासाठी विशेष प्रवेश फेऱ्या असे प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप असते.

कोरोनाचा प्रादुर्भाव, लांबलेले शैक्षणिक वर्ष, यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर संपवणे आवश्यक आहे. यंदा सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार असून त्यासाठी १ जुलैपासून कॉलेजच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तर त्यानंतर काही दिवसांतच ही प्रवेश प्रक्रिया आणि त्याची प्राथमिक माहिती भरण्याची प्रकिया सुरू केली जाणार आहे. मागील वर्षी मुंबई महानगर क्षेत्रात ३ लाख १९ हजार १८६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ लाख ८ हजार २१७ जागा शिल्लक राहिल्या होत्या. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अकरावीचे प्रवेश मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता असल्याने रिक्त जागांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.

अशा असतील प्रवेश फेऱ्या...

  • नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील.
  • द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील.
  • नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील.
  • विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील.

मागील वर्षी रिक्त राहिलेल्या जागांची संख्या -
कला - १४ हजार २६०
वाणिज्य - ५५ हजार ७०१
विज्ञान - ३५ हजार ६७४
एचएसव्हीसी - २ हजार ५८२
एकूण रिक्त जागा - १ लाख ८ हजार २१७

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.