मुंबई - राज्यात आज (शुक्रवारी) १३ हजार ८८५ जणांनी कोरोनावर मात केली. तर ११ हजार ४४७ नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण १३ लाख १६ हजार ७६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. याबरोबरच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदवली गेली आहे. दिवसभरात ११ हजार ४४७ नवीन रुग्ण आढळून आले. तर १३ हजार ८८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी होऊन १ लाख ८९ हजार ७१५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७९ लाख ८९ हजार ६९३ नमुन्यांपैकी १५ लाख ७६ हजार ६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.७३ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ३३ हजार ५२२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार १७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शुक्रवारी ३०६ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. तर आतापर्यंत एकूण ४१ हजार ५०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या एकूण ३०६ मृत्यूंपैकी १११ मृत्य मागील ४८ तासातील तर ७० मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १२५ मृत्यू एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.