ETV Bharat / state

अकरावीच्या वेळापत्रकाचा अन् माहिती पुस्त‍िकेचाही पत्ता नाही; तरीही‍ शिक्षणमंत्र्यांकडून प्रवेशाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

author img

By

Published : Aug 1, 2020, 9:04 PM IST

अकरावीच्या प्रवेशासाठी आत्तापर्यंत माहिती पुस्तिका आणि त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर होणे आवश्यक असताना त्या दोन्हीचाही अजून पत्ता नाही.

मंत्री वर्षा गायकवाड
मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई - विद्यार्थ्यांसमोर असलेल्या अडचणींचा कोणताही विचार न करता केवळ‍ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ‍आटापिटा करत सुटल्या आहेत. २६ जुलै रोजीच सुरू झालेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाचे केवळ प्रसिद्धीसाठी आज त्यांनी उद्धाटन करून हे स्पष्ट केले असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी आत्तापर्यंत माहिती पुस्तिका आणि त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर होणे आवश्यक असताना त्या दोन्हीचाही अजून पत्ता नाही. यामुळे आज ऑनलाईन नोंदणी करणारे विद्यार्थी संकटात सापडले असल्याचे दिवसभरात दिसून आले आहे. हातात पुस्तिकाच नसल्याने कोणत्या महाविद्यालयांची निवड करावी, त्यांचे शुल्क काय आहे, याची माहितीच विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना याचा त्रास सोसावा लागत आहे. अनेकांनी प्रवेशसाठीच्या प्रक्रियेचे शुल्क भरलेले असतानाही त्यांना ते दाखवले जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यातच हे संकेतस्थळ दिवसभर अनेकदा चालत नसल्याने असंख्य विद्यार्थ्यांनी यासाठी विचारणा करण्याचा प्रयत्न केला, मात्र यंदा पहिल्यांदाच पुण्यातून नियंत्रण असल्याचे या विभागाचे संचालकही यावर काही बोलण्यास तयार नसल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी आज पहिला टप्पा भरण्यासाठी पुढे आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना याचा त्रास सोसावा लागत आहे.

ऐनवेळी ऑनलाईनसाठी कंपनीच बदलली

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेसाठी यंदा शालेय शिक्षण विभागातील संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या मर्जीमुळे मागील तीन वर्षे सुरू नायस प्रा. लि. या कंपनीचे कंत्राट करण्यात आले आहे. तर ऑनलाईन शिक्षणात राज्यात कोणताही अनुभव नसलेल्या आणि मुख्य कार्यालय बंगळुरू असलेल्या पण पुण्यात कार्यालय थाटलेल्या तलिष्का नावाच्या कंपनीला दिले असल्याने या कंपनीकडून चालविण्यात येत असलेले अकरावी ऑनलाईनचे संकेतस्थळ नीट चालत नाही. यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. आज दिवसभरात अनेक विद्यार्थ्यांना याचा त्रास झाल्याने येत्या काळात अकरावीच्या प्रवेशाचा मोठा गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी आहेत ३ लाख २० हजार जागा

आज अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ८३० कनिष्ठ महाविद्यालयांत ३ लाख २० हजार १२० जागा उपलब्ध आहेत. यात सर्वाधिक जागा या वाणिज्य शाखेच्या १ लाख ७३ हजार ९६० जागा तर त्या खालोखाल विज्ञान शाखेच्या १ लाख ३ हजार १९० इतक्या आहेत. तर कला शाखेच्या केवळ ३७ हजार ३०० आणि एमसीव्हीसीच्या ५ हजार ६०० जागा उपलब्ध आहेत. या सर्व जागांवर ऑनलाईन प्रवेश केले जाणार आहेत.

प्रवेशासाठी यंदा घरातून कागदपत्रे दाखल करता येणार
राज्यात कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन आपली कागदपत्रे सादर करण्याऐवजी ॲपवर आणि प्रवेशासाठी असलेल्या संकेतस्थळावर करण्याचीही मुभा मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आदी महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.