मुंबई - मान्सून केरळमध्ये 3 जूनला दाखल होणार आहे. यंदा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या नव्या अंदाजानुसार यंदा पश्चिम भारतात 92 ते 108 टक्के पाऊस होण्याती शक्यता आहे. दुसरीकडे दख्खनच्या पठारावर 93 ते 107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून जून महिन्यात होणाऱ्या पावसाची सरासरीचे देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पूर्व भारत, मध्य भारत, हिमालय आणि मध्य भारताचा पूर्वेकडील भागामध्ये मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उत्तर पूर्वेकडील काही भागात सरासरीच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असे सांगितले होते.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सहा दिवसानंतर महाराष्ट्र दाखल होतो. 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात व मुंबईत दाखल होईल. 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मान्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. यावेळी देखील तौक्ते चक्रीवादळमुळे मान्सून लांबीवर पडेल, असे वाटत होते. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या माहितीमुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा - हर्बल पावडरच्या नावाखाली 4 कोटी रुपयांची फसवणूक, १० पैकी ३ आरोपींना अटक