मुंबई : एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला ( ST Corporation increase seasonal fare ) आहे. मात्र दिवाळीच्या तोंडावर 10 टक्के इतकी भाडे वाढ केली होती. दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर मध्यरात्री पर्यन्तच भाडे वाढ केली गेली होती. आज मध्यरात्रीपासून भाडे आकारणी पूर्ववत होणार आहेत.
10 टक्के भाडेवाढ : 10 टक्के भाडेवाढ साधी (परिवर्तन) बस, निमआराम (हिरकणी) बस, शिवशाही (आसन) बस व शयन आसनी बसेसला लागू राहील. मात्र शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. असा खुलासा जनसंपर्क अधिकरी राज्य एसटी महामंडळाकडून करण्यात आलेला आहे. तसेच ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. त्या प्रवाशांकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर ( New ST Ticket Price ) यातील फरक घेण्यात येत होते. यातून मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेसना वगळण्यात आले होते.
भाडेवाढ हंगामी : या संदर्भात एसटी महामंडळ प्रवक्ते यांनी सांगितले,"भाडेवाढ हंगामी होती. 31 ऑक्टोबर मध्यरात्री पासून ती संपुष्टात येईल, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील;" असे एसटी. महामंडळाकडून कळविण्यात आले ( fare Increase to increase ST Corporation revenue ) आहे.