ETV Bharat / state

मुंबई व उपनगरात आचारसंहिता कालावधीत १०.३६ कोटींची रक्कम जप्त

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार मुंबई व उपनगर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अमलबजावणी काळात निवडणूक आचारसंहिता भंग, सामाजिक शांतता भंग व इतर प्रकरणांत १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भरारी पथकांमार्फत कारवाई करण्यात आलेल्या २१ प्रकरणात १०.३६ कोटींची रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 20, 2019, 8:45 PM IST

मुंबई- राज्यातील सार्वत्रिक निवडणूक २०१९ दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यात आदर्श आचारसंहिता लागू केली होती. या आचारसंहिता अंमलबजावणी काळात मुंबई उपनगर जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता, सामाजिक शांतता भंग करणे व इतर प्रकरणातून भरारी पथकाला १०.३६ कोटी रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.

मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अमलबजावणी काळात निवडणूक आचारसंहिता भंग, सामाजिक शांतता भंग व इतर प्रकरणांत १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भरारी पथकांमार्फत कारवाई करण्यात आलेल्या २१ प्रकरणात १०.३६ कोटींची रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील ५१२९ अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत.

आचारसंहिता भंग, सामाजिक शांतता भंग व इतर प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या १४ गुन्ह्यांपैकी ३ अदखल पात्र गुन्हे आहेत. गोरेगाव पोलिसांच्या हद्दीतून ४१० ग्रामचा अवैध गांजा एका उबेर कारमधून जप्त करण्यात आला असून एनडीपीएस नार्कोटिक्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली पूर्व येथून जिवंत काडतूस आणि बंदूक जप्त करण्यात आली असून आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध शस्त्र जप्त

मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध प्रकरणात अवैधरित्या शस्त्र बाळगणे आणि बेकायदेशीररित्या शस्त्र विकण्याच्या आरोपात भारतीय दंड विधानाच्या शस्त्र कायद्यानुसार आतापर्यंत परवाना नसलेली ३९७ शस्त्र जप्त करण्यात आली आहे. तसेच परवाना धारकांकडून ३९१ शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. यामध्ये तलवारी, चाकू, कोयता, देशी कट्टा, बंदुका, काडतूस, चॉपर सारख्या शस्त्रांचा समावेश आहे.

सीआरपीसी प्रतिबंधात्मक कारवाई

फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची ३५०६ प्रकरणे विचारात घेण्यात आली आहे. तसेच ४७९ प्रकरणात अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड ) घेण्यात आली आहेत. तर २८१० प्रकरणात अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. तसेच १०९६ प्रकरणात अजामीन पत्र वॉरंट बजावण्यात आला असून ४५७ प्रकरणात अद्यापपर्यंत कारवाई सुरु आहे.

तपासणी नाके

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण १२५ तपासणी नाके कार्यरत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांमार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघात ४७ लाख ९१ हजार किंमतीचे अवैध मद्य आणि वाहने जप्त करण्यात आली असून आतापर्यंत १८९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत १५ लाख ५१ हजार किंमतीचे २३ हजार ५८२ लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर, १७ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा- ईव्हीएम मशीनवर मतदान होते तरी कसे?

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.