ETV Bharat / state

मुंबईत 1 हजार 354 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, बाधितांचा 90 हजारांच्या पार - मुंबई कोरोना बातमी

मुंबईत शुक्रवारी (दि. 11 जुलै) 1 हजार 354 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 73 रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे.

file photo
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jul 11, 2020, 2:35 AM IST

मुंबई - कोरोनाचे मुंबईत शुक्रवारी (दि. 10 जुलै) नवे 1 हजार 354 रुग्ण आढळून आले असून 73 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 90 हजार 149 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 5 हजार 202 वर पोहचला आहे. मुंबईमधून शुक्रवारी 2 हजार 183 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शुक्रवारपर्यंत 61 हजार 934 वर पोहचला आहे. मुंबईत सध्या 22 हजार 738 सक्रिय (अॅक्टीव) रुग्ण असून मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर पोहचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे मुंबईत शुक्रवारी 73 जणांचा मृत्यू झाला आहे. 73 मृत्यांपैकी 58 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 53 पुरुष आणि 20 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 2 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 55 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक तर 16 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर पोहचला आहे. 3 ते 9 जुलैपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.41 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 49 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा 751 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) घोषित करुन ते सिल करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 597 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सिल करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 3 लाख 79 हजार 554 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - राज्यात ७ हजार ८६२ कोरोनाबाधित; २२६ मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.