ETV Bharat / state

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा अन दारात महिलांचा ठिय्या

बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्व साधारण सभा सुरू असतानाच सभागृहाच्या प्रवेशद्वारावर औसा तालुक्यातील लामजना येथील महिलांनी घागरी घेऊन ठिय्या दिला होता.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा अन दारात महिलांचा ठिय्या
author img

By

Published : Sep 5, 2019, 12:45 PM IST

लातूर - जिल्ह्यात भर पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. यासंदर्भात बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्व साधारण सभा सुरू असतानाच सभागृहाच्या प्रवेशद्वारावर औसा तालुक्यातील लामजना येथील महिलांनी घागरी घेऊन ठिय्या दिला होता.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा अन दारात महिलांचा ठिय्या

लातूर जिल्ह्यात विशेषतः औसा तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी उपाययोजनेबाबत एक ना अनेक घोषणा केल्या. मात्र, पाणीप्रश्न हा कायम आहे. सिंचन विहिरींसाठी अर्ज केला असतानाही लामजना मंडळात एकही विहीर मंजूर करण्यात आली नाही. परिणामी येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. सिंचन विहिरींची मान्यता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर गेल्याने गटविकास अधिकारी व ग्रामसेवक हे उदासीन आहेत, असा आरोप ग्रमस्थांनी केला आहे.

गेल्या दोन महिन्यापासून या गावात पाणी नाही त्यामुळे ग्रामस्थांची भटकंती कायम आहे. रोजंदारी बाजूला सारत येथील महिलांना पाण्यासाठी दिवस खर्ची करावा लागत आहे. त्यामुळे जगावे की मारावे असा सवाल या ठिय्या आंदोलनातील महिलांनी केला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या सभागृहात असलेलेल्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सुरवातीला कक्षबाहेर न येता या महिलांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, हलगी नाद करताच अधिकऱ्यांनी बाहेर येऊन नियमित वेळी पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राजकुमार कसबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Intro:जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा अन दारात महिलांचा ठिय्या
लातूर : जिल्ह्यात भर पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. यासंदर्भात बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्व साधारण सभा सुरू असतानाच सभागृहाच्या प्रवेशद्वारावर औसा तालुक्यातील लामजना येथील महिलांनी घागरी घेऊन ठिय्या दिला होता.
Body:लातूर जिल्ह्यात विशेषतः औसा तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी उपाययोजनेबाबत एक ना अनेक घोषणांचा पाऊस पडला. मात्र, पाणीप्रश्न हा कायम आहे. सिंचन विहिरींसाठी अर्ज केला असतानाही लामजना मंडळात एकही विहीर मंजूर करण्यात आली नाही. परिणामी येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. सिंचन विहिरींची मान्यता मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या स्थरावर गेल्याने गटविकास अधिकारी व ग्रामसेवक हे उदासीन आहेत. गेल्या दोन महिन्यापासून या गावात पाणी नाही त्यामुळे ग्रामस्थांची भटकंती कायम आहे. रोजनदारी बाजूला सारत येथील महिलांना पाण्यासाठी दिवस खर्ची करावा लागत आहे. त्यामुळे जगावे की मारावे असा सवाल या ठिय्या आंदोलनातील महिलांनी केला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या सभागृहात असलेलेले अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी कक्षबाहेर न येता या महिलांकडे दुर्लक्ष केले होते. Conclusion:मात्र, हलगी नाद करताच अधिकऱ्यांनी बाहेर येऊन नियमित वेळी पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राजकुमार कसबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.