लातूर - औसा तालुक्यातील किल्लारी शिवारात २२ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. बुधवारी दुपारी ४ च्या दरम्यान ही घटना समोर आली असून खुनामागचे कारण अस्पष्ट आहे.
पल्लवी सगर असे मृत महिलेचे नाव असून मागच्यावर्षी संदीप सगर यांच्याशी विवाह झाला होता. आज त्या स्वतःच्या शेतामध्ये गेल्या होत्या. दुपारी ४ च्या दरम्यान त्यांचा मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाखाली आढळून आला. चेहरा दगडाने ठेचल्याने लवकर ओळख पटत नव्हती. मात्र, तपासानंतर मृतदेह पल्लवी सगर यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदनासाठी मृतदेह किल्लारी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.