ETV Bharat / state

ऐकावं ते नवलच; महिलांनी 'यासाठी' नळाची पूजा करुन बांधली लिंबू -मिरची

अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण असूनही शहरात भीषण पाणीटंचाई आहे. शहराला लिंबोटी धरणावरुन पाणी पुरवठा केला जातो. मात्र, नगरपालिकेच्या नियोजनाअभावी गेल्या दीड महिन्यापासून नळाला पाणी नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी चक्क नळालाच पूजा-अर्चा करुन लिंबू- मिरची बांधून आंदोलन केले.

latur
नळाची पूजा करुन लिंबू -मिरची बांधताना महिला
author img

By

Published : Jun 24, 2020, 3:25 PM IST

Updated : Jun 24, 2020, 5:13 PM IST

लातूर - कुणाची दृष्ट लागू नये, म्हणून लिंबू-मिरची बांधण्याची परंपरा आहे. मात्र, अहमदपूरमध्ये चक्क नळालाच पूजा-अर्चा करून लिंबू- मिरची बांधण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाणी येत नसल्याने अशाप्रकारे महिलांनी रोष व्यक्त केला आहे.

ऐकावं ते नवलच; महिलांनी 'यासाठी' नळाची पूजा करुन बांधली लिंबू -मिरची

अहमदपूर तालुक्याचे ठिकाण असूनही शहरात भीषण पाणीटंचाई आहे. शहराला लिंबोटी धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, नगरपालिकेच्या नियोजनाअभावी गेल्या दीड महिन्यापासून नळाला पाणी नाही. याबाबत लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊनही पाणीप्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे महिलांनी आक्रमक होत थेट नळाला लिंबू-मिरची बांधली आहे.

latur
नळाची पूजा करताना महिला

याच लिंबोटीत मुबलक पाणीसाठा आहे. धरणातून कंधार तसेच इतर शहरांना नियमित पाणीपुरवठा केला जातो. मात्र, लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष, यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. परंतु अहमदपूर येथील नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे आता महिलांनी अशा प्रकारे निषेध व्यक्त करूनही पाणी प्रश्न मार्गी लागणार का हे पाहावे लागणार आहे.

Last Updated : Jun 24, 2020, 5:13 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.