ETV Bharat / state

कोरोनापेक्षा पाणीटंचाईची चिंता; एकाच कुपनलिकेवर भागवतेय संपूर्ण गाव तहान

ममदापुर लातूर-नांदेड मार्गावरील अडीच हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. शहरापासून अवघ्या 13 किमी आणि मुख्यमार्गावर गाव असल्याने गावात सर्व सोई- सुविधा आहेत. मात्र, पाण्यासाठी बाराही महिने हे गाव तहानलेलेच असते. पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाचा घोटाळा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे पूर्वजांनी उभारलेली कूपनलिकाच गावकऱ्यांची तहान भागवत आहे.

author img

By

Published : Apr 29, 2020, 9:15 AM IST

Water scarcity
पाणीटंचाई

लातूर - देशात सध्या कोरोनाचे संकट घोंगावत आहे. लातूरकरांना मात्र, दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई जणू काही पाचवीलाच पुजली असल्यासारखी अवस्था जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहे. शहराला 10 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असून गावांची अवस्था मात्र, भीषण आहे. शहरापासून अवघ्या 13 किमी अंतरावर असलेल्या ममदापुरला महिन्यातून एकदा, अनिश्चित अशा प्रकारे पाणीपुरवठा केला जात आहे. सबंध गावासाठी एकच कूपनलिका(हातपंप) असून अनेकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

कोरोनापेक्षा पाणीटंचाईची चिंता

ममदापुर लातूर-नांदेड मार्गावरील अडीच हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. शहरापासून अवघ्या 13 किमी आणि मुख्यमार्गावर गाव असल्याने गावात सर्व सोई- सुविधा आहेत. मात्र, पाण्यासाठी बाराही महिने हे गाव तहानलेलेच असते. पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाचा घोटाळा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे पूर्वजांनी उभारलेली कूपनलिकाच गावकऱ्यांची तहान भागवत आहे.

एकाच कूपनलिकेवर गर्दी न करता ठरवून दिलेल्या भागातील ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी येतात. कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या कोरोनाचे संकट सबंध देशावर असले तरी जिल्ह्यात एकही रूग्ण नाही. त्यामुळे या संकटापासून आम्ही दूर असलो तरी पाण्यासाठी रोजचेच मरण असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

ममदापुरप्रमाणेच याच मार्गावरील भातखेडा, नांदगाव या गावांचीही हीच स्थिती आहे. जिल्हा प्रधासनाकडे अधिग्रहणाचे प्रस्ताव येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, पाणीटंचाई बाबत अद्याप कोणतेही पाऊल प्रशासनाने उचललेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.