ETV Bharat / state

भूकंपाच्या भेगा बुजल्या, वेदना मात्र कायम; काळ रात्रीच्या आठवणी किल्लारीकरांच्या तोंडून - किल्लारी भूकंप घडामोडी

1993 साली झालेल्या या भूकंपात हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला होता. कुटुंबच्या-कुटुंब मातीखाली गाडली गेली होती. तर कित्येक दिवस नागरिकांना या मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या दुर्घटनेनंतर किल्लारी गावाचे पूर्णतः स्थलांतर झाले आहे.

लातूर
लातूर
author img

By

Published : Sep 30, 2020, 5:03 PM IST

लातूर - तो भयाणक दिवस 30 सप्टेंबर 1993... एकाच रात्रीत किल्लारीसह परिसरातील 52 खेड्यांमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्यानं होत्याचं नव्हतं झालं होतं. किल्लारीत सुमारे 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. यामुळे गावातील सर्वच घरे जमीनदोस्त झाली होती. जागोजागी मातीचे ढिगारे असतानाही काहीजण आश्चर्यकारकरित्या जिवंत राहिले होते. आता 27 वर्षानंतर भूकंपाच्या भेगा बुजल्या असल्या तरी त्या वेदना कायम आहेत.

भूकंपाच्या आठवणी सांगताना नागरिक

1993 साली झालेल्या या भूकंपात हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला होता. कुटुंबच्या-कुटुंब मातीखाली गाडली गेली होती. तर कित्येक दिवस नागरिकांना या मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या दुर्घटनेनंतर किल्लारी गावाचे पूर्णतः स्थलांतर झाले आहे. जुन्या गावात केवळ निलकंठेश्वराचे मंदिर आहे तर गावच्या मध्यभागी स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. तर मृतांच्या नावाने वृक्ष लागवडीचा उपक्रम गावकऱ्यांनी आणि वनविभागाने हाती घेतला आहे. बुधवारी आमदार अभिमन्यू पवार तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. 27 वर्षानंतर ग्रामस्थांचे जनजीवन सुरळीत चालू झाले आहे. मात्र, त्या काळरात्रीच्या भयाणक आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात कायम आहेत. शिवाय मदतीची आश्वासनेही हवेत विरली असून विविध सोई-सुविधांची पूर्तता करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

हेही वाचा - लातूरकरांसाठी खुशखबर; मांजरा धरणाची पाणीपातळी वाढल्याने पाणीप्रश्न मिटला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.