ETV Bharat / state

निराधार 'मामां'ना गावाचा आधार, 'मोहन मामा'ची अनोखी कहाणी - mohan mamas 75th birthday celebration

खरोळा गावातील निराधार मोहन कदम यांना संपूर्ण गाव मोहन मामा या नावाने ओळखते. मुले कामानिमित्त बाहेरगावी असतात आणि मामा हे गावातच मिळेल ते खाऊन, गावकऱ्यांसोबत राहतात. त्यांचा ७५ वा वाढदिवस गावकऱ्यांनी मिळून साजरा केला.

latur
गावकऱ्यांनी साजरा केला मोहन मामांचा ७५ वा वाढदिवस
author img

By

Published : Jan 2, 2020, 12:48 PM IST

लातूर - रेणापूर तालुक्यातील खरोळा हे १५ ते १८ हजार लोकवस्ती असलेले गाव. या गावामध्ये राहणाऱ्या एका निराधार वयोवृद्ध व्यक्तीचा वाढदिवस गावकऱ्यांनी मिळून साजरा केला आहे. रक्ताचे नाते नसतानाही गावकऱ्यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात गावात जंगी कार्यक्रम घेऊन 75 वा वाढदिवस साजरा केला आहे. मोहन मामा कदम (वय ७५) असे या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव आहे. गावात सगळे त्यांना 'मोहन मामा' नावाने हाक मारतात.

गावकऱ्यांनी साजरा केला मोहन मामांचा ७५ वा वाढदिवस

खरोळा गावात राहणारे मोहन काका हे पत्नीच्या मृत्यूनंतर एकटे पडले. त्यांची दोन्ही मुले ही कामानिमित्त पुण्या-मुंबईला असतात. मात्र, मामाने कधी गावची वेस ओलांडली नाही. काळाच्या ओघात त्यांच्या जुन्या घराची पडझड झाली आणि दुसरीकडे लग्नानंतर मुलांनी गावाकडे ढुंकूनही पाहिले नाही. अशा परस्थितीत मामांनी गावातच राहण्याचा निर्धार कायम ठेवला.

गावातील प्रत्येकाच्या खुशालतेची चौकशी मोहन मामा करीत असत. हाच लळा कायम राहिल्याने संबंध गावाने त्यांची जबाबदारी घेतली. संबंध गावाने त्यांचा ७५ वा वाढदिवस ढोल-ताशाचा गजर आणि जेवणावळी उठवून साजरा केला. तसेच, त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षी त्यांना निवारा करून देण्याचा निर्धार एस.आर ग्रुपने केला आहे. गावातील हजारो ग्रामस्थांची केवळ उपस्थितीच नाही तर, प्रत्येकाने मोहन मामाला भरपोषाख आहेर केला होता. गावकऱ्यांचे प्रेम पाहून मोहन मामा देखील भारावून गेले होते.

हेही वाचा - लातुरात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

निराधाला जगणे मुश्किल असते मात्र, खरोळा गावकऱ्यांनी मोहन मामाला असा जो आधार दिला, त्याचा हेवा समाजातील प्रत्येक घटकाला राहील. काळाच्या ओघात रक्ताच्या नात्याला विसर पडतो. हे वास्तव असले तरी या पलीकडे जाऊन खरोळा गावकऱ्यांनी मोहन मामाबद्दल घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला पत्रकार महेंद्र जोंधळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - निन्म तेरणा प्रकल्पाच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी; ४० गावातील शेतकऱ्यांना होणार लाभ

Intro:निराधार 'मामा'ला गावाचा आधार...मोहन मामाची अनोखी कहाणी
लातूर : मिळेल ती जागा आणि पोटाची खळगी भरण्यासाठी गावचे नागरिक देतील ते जेवण...हेच काय ते या मामाचे जीवन... मात्र, आशा जीवनालाही त्यांनी कधी दोष दिला नाही.... उलट भेटणाऱ्या प्रेत्येकाच्या खुशालीची चौकशी करून ते गावचे मामा बनले आहेत.... वय वर्ष 75 आणि गावात रक्ताचे एकही नाते नाही.... की राहायला झोपडी अशी अवस्था होती खरोळा गावच्या या मामाची.... मात्र, गावकऱ्यांनी या निराधार मामाचे जीवन बदलून टाकले आहे... रक्ताच्या नात्याने नाही पण संबंध गावकऱ्यांनी त्यांची जबाबदारी घेतली आहे.... त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात गावात जंगी कार्यक्रम घेऊन त्यांचा 75 वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला आहे... ही कहाणी आहे मोहन मामा कदम यांची...

Body:जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा हे सर्वश्रुत आहे. परंतु हे मिळवण्याची परिस्थिती नसल्याने मोहन मामा याला अपवाद आहेत. असे असले तरी गावकऱ्यांनी जो आदर्श घालून दिला तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.... रेणापूर तालुक्यातील खरोळा हे १५ ते १८ हजार लोकवस्थीचे गाव... आणि याच गावचे हे मोहन मामा.... पत्नी देवाघरी गेली आणि दोन्ही मुलं ही कामानिमित्त पुण्या- मुंबईला मात्र, मामाने कधी गावची वेस ओलांडली नाही.... काळाच्या ओघात त्यांच्या जुन्या घराची पडझडही झाली आणि इकडे लग्नानंतर मुलांनी गावाकडे डुंकूनही पाहिले नाही... आशा परस्थिमध्येही मामाने गावातच राहण्याचा निर्धार कायम ठेवला....गावातील प्रत्येकाला त्याच्या खुशालतेची चौकशी मोहन मामा करीत असत...हाच लळा कायम राहिल्याने संबंध गावाने त्यांची जबाबदारी घेतली आहे. आज त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षी त्यांना निवारा करून देण्याचा निर्धार एस. आर ग्रुपने केला आहे तर संबंध गावाने त्यांचा ७५ वा वाढदिवस ढोल - ताशाचा गजर आणि जेवणावळी उठवून साजरा केला. गावातील हजारो ग्रामस्थांची केवळ उपस्थितीच नाही तर प्रत्येकाने मोहन मामाला भरपोषख आहेर केला होता. गावकऱ्यांचे प्रेम पाहून मोहन मामा देखील भारावून गेले होते....निराधाला जगणे मुश्किल असते मात्र, खरोळा गावकऱ्यांनी मोहन मामाला असा काय आधार दिला आहे त्याचा हेवा समाजातील प्रत्येक घटकाला राहील...

Conclusion:काळाच्या ओघात रक्ताच्या नात्याला विसर पडत आहे हे वास्तव असले तरी या पलीकडे जाऊन खरोळा गावकऱ्यांनी मोहन मामा बद्दल घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला पत्रकार महेंद्र जोंधळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.