ETV Bharat / state

विलासराव देशमुख यांची आज ७४ वी जयंती, बाभळगावात आदरांजली सभा - amit deshmukh

आज (२६ मे) दिवंगत विलासराव देशमुख यांची ७४ वी जयंती आहे. त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

आज विलासराव देशमुख यांची ७४ वी जयंती
author img

By

Published : May 26, 2019, 2:24 PM IST

लातूर - काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज ७४ वी जयंती. त्यानिमित्त लातूरमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, अस्तिरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. तर बाभळगावमध्ये देशमुख कुटुंबीयांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

विलासराव देशमुख यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात सामाजिक उपक्रम घेण्यात आले. बाभळगावमध्ये आमदार अमित देशमुख, दिलीप देशमुख, वैशाली देशमुख, रितेश देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती. विलासबागेत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. राम बोरगावकर आणि इतर कलाकारांचा आज सकाळी ९ वाजता स्वरवंदना हा कार्यक्रम पार पडला. तर दिवसभरात रक्तदान, आरोग्य शिबीर व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. येथील पोद्दार हॉस्पिटलमध्ये गेल्या ५ वर्षांपासून अस्थीरोग शिबीर पार पडत आहे. या शिबारामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधार मिळत आहे. डॉ. अशोक पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून, दुपारपर्यंत 250 रुग्णांनी लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:बाभूळगावात विलासराव देशमुख यांच्या जयंतीमित्त आदरांजली सभा
लातूर : स्व. विलासराव देशमुख यांची 74 वी जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, अस्तिरोग तपासणी शिबीर पार पडले. तर बाभूळगाव येथे देशमुख कुटुंबीयांनी आदरांजली अर्पण केली.
Body:विलासराव देशमुख यांची 74 वी जयंतीनिमित्त जिल्हाभरात सामाजिक उपक्रम घेण्यात आले. बाभूळगाव येथे आ.अमित देशमुख, दिलीप देशमुख, वैशालिताई देशमुख, रितेश देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह कुटुंबतील सर्व सदस्यांची उपस्थिती होती. येथील विलास बागेत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. तर सकाळी 9 वाजता डॉ. राम बोरगावकर आणि इतर कलाकारांचा स्वरवंदना कार्यक्रम पार पडला. तर दिवसभरात रक्तदान, आरोग्य शिबीर व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. येथील पोद्दार हॉस्पिटलमध्ये गेल्या 5 वर्षांपासून अस्थीरोग शिबीर पार पाडत आहे. या शिबारामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधार मिळत आहे. डॉ. अशोक पोद्दार यांच्या मार्गदर्शनाकजीहा उपक्रम सुरू असून आज दुपार पर्यंत 250 रुग्णांनी लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. Conclusion:प्रार्थना प्रसंगी काँगेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.