लातूर - शहरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात 25 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवारी (दि.29 सप्टें.) रात्री उशिरा घडली आहे. घटनेचे कारण आद्यपही स्पष्ट झाले नसून अज्ञातांविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रेणापूर तालुक्यातील तत्तापूर येथील श्रीकांत आत्मलिंग चितरगे (वय 25 वर्षे) हा तरुण शेत मालाच्या मालवाहतुकीचे काम करीत होता. मंगळवारी रात्री उशिरा अज्ञातांनी त्याच्या डोक्यात आणि पाठीवर हत्याराने मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. आज (दि.30 सप्टें.) सकाळी ही बाब उघडकीस आली असून श्रीकांत याचा भाऊ ओम याने दिलेल्या तक्रारीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्रीकांत हा शेती मालाची वाहतूक करत होता. सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वर्दळ नसलेल्या ठिकाणी काही अज्ञातांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्येच श्रीकांतच्या डोक्यात व पाठीला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे तत्तापूर गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या, पीकविम्यासाठी मुदत वाढविण्याची मागणी