ETV Bharat / state

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुटणार प्रचाराचा नारळ, आज विलासराव देशमुखांच्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण - deshmukh

दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आजही लातूरकरांच्या मनात आदर कायम आहे. आज त्यांच्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.

दिवंगत विलासराव देशमुख यांचा पुतळा
author img

By

Published : Feb 24, 2019, 8:45 AM IST

लातूर - काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूरमध्ये आज लोकसभा प्रचाराचा नारळ फुटण्याची शक्यता आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण होणार आहे. यानिमित्त काँग्रेसचे सर्वच बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आजही लातूरकरांच्या मनात आदर कायम आहे. आज त्यांच्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. मांजरा कारखान्यावर हा कार्यक्रम होणार आहे.

दिवंगत विलासराव देशमुख यांचा पुतळा

लातूर हा कॉग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काळाच्या ओघात भाजपचे जिल्ह्यात वर्चस्व निर्माण झाले असले तरी विलासराव देशमुख यांच्याबद्दल आजही लोकांमध्ये प्रचंड आदर आहे. निवडणुकांच्या तोंडावर या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने देशातील काँग्रेसचे नेते लातूरात दाखल होत आहेत. २ महिन्यापुर्वी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. शिवाय शहराबरोबरच जिल्ह्यातील जागा अधिक प्रमाणात निवडूण आणण्याची जबाबदारी आमदार अमित देशमुख यांच्यावर सोपिवण्यात आली होती.

उमेदवाराबद्दल वरीष्ठ समिती योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून या कार्यक्रमात येथील उमेदवाराचे नाव घोषित होणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Intro:कॉग्रेसच्या बलेकिल्ल्यातच फुटणार लोकसभा प्रचाराचा नारळ !
लातूर - स्व. विलासराव देशमुख यांच्या पुर्णकृती पुतळ्याचे आज लोकार्पण होणार आहे. यानिमित्ताने कॉग्रेसचे वरीष्ठ नेते लातूरमध्ये दाखल होत असून यंदाच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही काँग्रेसच्या बालेकिल्लयातूनच होणार असल्याचा अंदाज वर्तिवला जात आहे.
Body:कोणतेही निमित्त साधून लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सर्वच पक्षांकडून सुरवात केली जात आहे. लातूर हा कॉग्रेसचा बालेकिल्ला समजला जात आहे. काळाच्या ओघात भाजपाचे जिल्ह्यात वर्चस्व निर्माण झाले असले तरी स्व. विलासराव देशमुख यांच्याबद्दल आजही लातूरकरांच्या मनात आजही आदर आहे. आज त्यांच्याच स्मृतीस्थळाचे लोकार्पण कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. याकरिता लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी राज्यपाल शिवाजी पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, आ. अमित देशमुख, सिनेअभिनेता रितेश देशमुख यांची उपस्थिती मांजरा कारखान्यावर होाणाऱ्या कार्यक्रमास लाभणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने देशातील कॉग्रेसचे नेते लातूरात दाखल होत आहेत. दोन महिन्यापुर्वी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. शिवाय शहराबरोबरच जिल्ह्यातील जागा अधिक प्रमाणात निवडूण आणण्याची जबाबदारी आ. अमित देश्मुख यांच्यावर मध्यंतरी झालेल्या दुष्काळ परिषदेमध्ये सोपिवण्यात आली होती. उमेदवाराबद्दल वरीष्ठ समिती योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Conclusion:आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून या कार्यक्रमात येथील उमेदवाराचे नाव घोषित होणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.