लातूर : औसा तालूक्यातील वाघोली पाटीजवळ दोन जीपची समोरासमोर टक्कर होवून या अपघातात ( Jeep Accident Ausa Latur ) तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला ( Three Passengers Died 13 Injured ) आहे. जखमींना लातूर व औसाच्या शासकीय रुग्णालयात ( Ausa Government Hospital ) दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींवर औषधोपचार सुरु
निलंग्याहून औसाच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या काळी - पिवळी जीपची, औसाहून निघालेल्या जीपला समोरासमोर टक्कर झाली. औसा शहरापासून जवळच असलेल्या वाघोली पाटीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन प्रवाशी जागीच ठार झाले. जखमींपैकी अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक ( Two Passengers Health Critical ) आहे. इतर जखमींवर लातूर व औसाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाहतूक झाली होती ठप्प
घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस ठाण्याचे ( Ausa Police Station ) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालायात पाठवले. मोठा अपघात झाला असल्याने औसा ते लामजना मार्गावर वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी नंतर ही वाहतूक सुरळीत केली.
दुपारी परभणीत अपघात
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या पेठशिवणी परिसरात रविवारी (दि.26) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भरधाव जीप आणि कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला ( Three Died in Accident at Parbhani ) असून, एक जण गंभीर जखमी आहे. कारमधील सर्वजण पुण्यातील रहिवासी असून, गंभीर जखमींना उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे.