लातूर - एटीएममधून पैसे काढणे अडचणीचे झाले म्हणून चोरट्यांनी मशीनच चोरुन नेल्याची घटना घडली आहे. चाकूरमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र एटीएममधील रक्कम चोरीला गेली असून रिकामे एटीएम मशीन पोलिसांच्या हाती लागले आहे.
घटना काय आहे?
लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहे. चाकूर येथील ऊस्रगे इमारतीत बँक ऑफ इंडियाचे एटीएम होते. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा डाव फसल्यानंतर त्यांनी मशीनच पळवले. यात 16 लाख 70 हजार रुपये होते. शहराच्या बाहेर जाऊन मशीनमधील पैसे लंपास केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पाठलाग केला. चोरट्यांनी पैसे काढून मशीन रस्त्यावरच फेकून दिले होते. त्यामुळे तपासादरम्यान रिकामे एटीएम पोलिसांच्या हाती लागले आहे. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबईतील कोरोनाचे नवे 'हॉटस्पॉट' - बोरीवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूरमध्ये रुग्णवाढ