लातूर- उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. अशातच एक दिलासादायक बाब घडली आहे. 8 कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 142 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
हेही वाचा- बोरिस जॉन्सन अन् कॅरी सायमंड्स यांनी आपल्या मुलाचे 'हे' ठेवले नाव
लातूर जिल्ह्यात केवळ उदगीर शहरातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 8 जणांना कोरोनाची लागण झाली असून या सर्वांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, या रुग्णांच्या संपर्कात डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, कर्मचारी याच्यासह इतरांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. तर 4 जणांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
एकट्या उदगीर शहरातच 8 रुग्ण आढळून आल्याने 13 मे पर्यंत शहरात संचारबंदी करण्यात आली आहे. 3 मे नंतर इतरत्र प्रवास करता येणार असला तरी उदगीर शहर कडकडीत बंद असल्याने येथून ना प्रवास करता येणार आहे ना कुणाला शहरात येता येणार आहे. 8 दिवसांपूर्वी कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा देखील घरपोच दिली जात आहे.