ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी-नियमांसह लातुरात पार पडली जेईई परीक्षा - jee exam students view latur

लांबणीवर जात असलेली परीक्षा अखेर पार पडत असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. अभ्यासाला भरपूर वेळ मिळाल्यामुळे चांगले मार्क्स मिळतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तर, परीक्षेसाठी पुरेशी काळजी घेत असल्याचे लातूरच्या २ परीक्षा केंद्रांचे प्रमुख असलेले प्रा. महेश तोडकर यांनी सांगितले.

जेईई परीक्षा
जेईई परीक्षा
author img

By

Published : Sep 6, 2020, 9:17 PM IST

लातूर- राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेली प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात जेईईच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस होता. शिक्षणाचा लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर शहरातील २ परीक्षा केंद्रावर आज आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग या २ विषयाची परीक्षा पार पडली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स, सॅनिटायझेशन इत्यादी क्रिया पार पाडल्यानंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.

माहिती देताना विद्यार्थी व पालक

विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्स राखून त्यांची तपासणी करण्यात आली. हात सॅनिटाईज करून त्यांना नवीन सर्जिकल मास्क दिल्यानंतरच परीक्षा केंद्रात सोडले जात होते. परीक्षा केंद्रातही ठराविक अंतरावर कॉम्प्युटर ठेवूनच ऑनलाइन परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, लांबणीवर जात असलेली परीक्षा अखेर पार पडत असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. अभ्यासाला भरपूर वेळ मिळाल्यामुळे चांगले मार्क्स मिळतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तर, परीक्षेसाठी पुरेशी काळजी घेत असल्याचे लातूरच्या २ परीक्षा केंद्रांचे प्रमुख असलेले प्रा. महेश तोडकर यांनी सांगितले.

हेही वाचा- कारण कोरोनाचे अन् अनास्था शासकीय अधिकाऱ्यांची; जनतेची मात्र फरफट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.