ETV Bharat / state

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होणार - जिल्हाधिकारी - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यक्रम
author img

By

Published : Oct 28, 2019, 10:47 PM IST

लातूर - गत आठवड्यामध्ये सर्वत्र चांगल्या स्वरूपात परतीचा पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी या पावसामुळे सोयाबीनसारख्या उभ्या पिकाचे तसेच पीक काढून शेतामध्ये ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकासाठी पिक विमा घेतलेला आहे,अशा शेतकऱ्यांनी पिक विमा अंतर्गत नुकसानभरपाईचा लाभ मिळण्यासाठी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी विहित नमुन्यात अर्ज करावा. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा विमा उतरवलेला नाही,अशा शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास आपल्या गावच्या संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांना संपर्क करावा. अशा शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा करून त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. तरी जिल्ह्यातील पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन खंबीरपणे आहे. पीक बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी चिंता नये, असे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे .

Intro:अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होणार : जिल्हाधिकारी
लातूर : गत आठवड्यामध्ये सर्वत्र चांगल्या स्वरूपात परतीचा पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी या पावसामुळे सोयाबीनसारख्या उभ्या पिकाचे तसेच पीक काढून शेतामध्ये काढून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
Body:परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकासाठी पिक विमा घेतलेला आहे,अशा शेतकऱ्यांनी पिक विमा अंतर्गत नुकसानभरपाईचा लाभ मिळण्यासाठी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी विहित नमुन्यात अर्ज करावा. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा विमा उतरवलेला नाही,अशा शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास आपल्या गावच्या संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांना संपर्क करावा. अशा शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा करून त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. तरी जिल्ह्यातील पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन खंबीरपणे आहे, Conclusion:पीक बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी चिंता नये, असे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे .
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.