ETV Bharat / state

थंडीमुळे रब्बी पिके जोमात, फळबागा कोमात

author img

By

Published : Dec 5, 2020, 4:18 PM IST

Updated : Dec 5, 2020, 4:56 PM IST

रब्बी हंगामातील पेरा यंदा एक महिन्याने उशिरा झाला आहे. असे असले तरी थंडीही एक महिना उशिरा सुरू झाल्याने पिकावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. आठ दिवसांपूर्वीच सरासरीच्या क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून शेतकरी आता पिकांना पाणी देण्यात व्यस्त आहेत. एकंदरीत खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पण, त्याच तुलनेत निसर्गानेही साथ देणे आवश्यक आहे.

रब्बी पीक
रब्बी पीक

लातूर - खरीप हंगाम असो की रब्बी, शेती ही निसर्गावरच अवलंबून असते. खरिपातील पिकांच्या नुकसानीसाठी जबाबदार असलेला पाऊस आता रब्बीसाठी वरदान ठरत आहे. शिवाय पेरणीनंतर जिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे. शुक्रवारी (दि. 4 डिसेंबर) 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे वातावरण रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी साठी पोषक आहे, तर फलबागांसाठी अपायकारक आहे. मात्र, जिल्ह्यात ऊस उत्पादन वगळता इतर फळपिकांचे क्षेत्र हे अत्यल्प आहे. त्यामुळे सध्याची थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जात आहे.

पोषक वातावरणामुळे रब्बी पिके जोमात, फळबाग कोमात

उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगाम लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहे. यामध्ये सरासरी क्षेत्रही अधिकचे आहे शिवाय सोयाबीन हे या हंगामातील मुख्य पीक आहे. तब्बल 6 लाख 20 हजार हेक्टर हे खरिपातील क्षेत्र आहे तर रब्बीचे क्षेत्र हे 2 लाख 28 हजार हेक्टर एवढे आहे. रब्बीत एकट्या हरभऱ्याची लागवड 2 लाख 48 हजार हेक्टरावर झाली आहे. रब्बीच्या एकूण सरासरीच्या क्षेत्रांपैकी हरभरा अधिक प्रमाणात झाला आहे. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने यंदा एका महिन्याने पेरण्या लांबल्या होत्या. मात्र पोषक वातावरणामुळे रब्बीतील सर्व पिकांची उगवण झाली आहे. आता पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. हे सर्व सकारात्मक होत असतानाच गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे पिकांची वाढ तर जोमाने होत आहे. शिवाय कोणत्याही रोगराईचा धोका राहिलेला नाही. सध्याचे वातावरण गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसाठी पोषक आहे.

फळबागांसाठी धोक्याची घंटा

जिल्ह्यातील वाढती थंडी ही फळबागांसाठी ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यात ऊस वगळता इतर फळपिके ही कमी आहेत. यंदा हरभरा या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. ज्वारी व गव्हाला बगल देत शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर भर दिला आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 2 लाख 28 हजार हेक्टर असताना सरासरीपेक्षा अधिकचे म्हणजे 3 लाख 20 हजार हेक्टरावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत तरी सर्व काही सुरळीत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

निसर्गाचा लहरीपणा, पदरात पडेल तेव्हाच खरे

पेरणीनंतर 15 दिवसातच रब्बीतील पिके मोठ्या डौलात उभी असली तरी शेतकऱ्यांच्या मनात निसर्गाच्या लहरीपणाची धास्ती आहे. खरिपातही सर्व काही सुरळीत होते पण अंतिम टप्प्यात मुसळधार पावसाने पिके पाण्यात गेली होती. आतापर्यंत रब्बीबाबत सर्व काही सुरळीत आहे. पण, भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे खरिपातील नुकसान डोळ्यासमोर येताच शेतकरी आता उत्पादनाला घेऊन आशादायी राहत नाही.

तुरीची पानगळती तर रब्बीतील पिकांची वाढ

खरिपातील तूर हे एकमेव पीक सध्या वावरात उभा आहे. मात्र, मध्यंतरी ढगाळ वातावरण आणि आता कडाक्याची थंडी यामुळे तूर करपून जात आहे. शिवाय पानगळती होत असल्याने उत्पादन घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तुरीच्या बाबतीत प्रतिकूल वातावरण असले तरी रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची वाढ जोमात सुरू आहे.

प्रमाणात थंडी म्हणून फायदा अन्यथा

दोन दिवसांपासून 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. यापूर्वीही 10 ते 11 अंश सेल्सिअसपर्यंतच तापमानाची नोंद झाली होती. यापेक्षा कमी तापमान झाले तर धोका निर्माण होणार असल्याची शक्यता कृषी अभ्यासक अतुल झुलपे यांनी वर्तवली आहे. मात्र, आतापर्यंत तशी परिस्थिती ओढवलेली नव्हती.

हेही वाचा - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये आंदोलन

Last Updated : Dec 5, 2020, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.