ETV Bharat / state

Car Accident Latur: कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; एकाच कुटुंबातील चार ठार

author img

By

Published : Mar 27, 2023, 3:30 PM IST

लातूर जिल्ह्यातील औसा-निलंगा मार्गावर आज (सोमवारी) कारचा भीषण अपघात झाला. कार रस्ता सोडून खड्ड्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे औसा परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Car Accident Latur
कार अपघात

लातूर: माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील बडुरकर यांच्या नातेवाईकांच्या मुलाचा पुण्यात लग्न समारंभ होता. तो आटोपून बडुरकर कुटुंबीय निलंग्याकडे निघाले होते. औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटीजवळ त्यांची कार येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सुसाट वेगात असलेली कार पुलाखालच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. त्यात बडुरकर कुटुंबातील चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. अंश किरण बडुरकर, जय सचिन बडुरकर, अमर सचिन बडुरकर आणि प्रकाश कांबळे अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत. अपघातात जान्हवी सचिन बडुरकर, यश किरण बडुरकर, गोदावरी सचिन बडुरकर, सचिन दिगंबर बडुरकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

वाहतुक ठप्प: अपघाताची माहिती मिळताच औसा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. याच अपघातात गंभीर जखमी झालेले गोदावरी सचिन बडुरकर, जान्हवी सचिन बडुरकर यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातामुळे औसा-निलंगा महामार्गावरील वाहतुक काही काळासाठी ठप्प झाली होती.

सोलापूरमध्येही कार अपघात: आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना भाविकांच्या कारचा झालेल्या अपघातात सिन्नर (जि. नाशिक) येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 21 मार्च 2023 रोजी सोलापूर येथे घडली होती. भरधाव कारचे टायर फुटल्याने वाहन पलटी झाले आणि त्यातून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. अपघातात पाच भाविक गंभीर जखमी झाले होते. हा अपघात मंगळवारी सकाळी घडला आहे. सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

अचानक कार पलटली: अपघातात मरण पावलेल्या तीन मृतदेहांवर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. निखिल रामदास सानप (वय 21 वर्ष,रा. चास, ता. सिन्नर, जि. नाशिक), अनिकेत बाळासाहेब भाबड (वय 22 वर्षे, रा. चास, ता. सिन्नर, जिनाशिक), अथर्व शशिकांत खैरनार (वय 22 वर्षे. रा. चास, ता. सिन्नर, जि. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. गणेश नामदेव खैरनार (वय ३२), पंकज रवींद्र खैरनार (वय ३०), जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बिडकर (वय २२), दीपक बिडकर (वय २४, रा. चास, ता. सिन्नर जि. नाशिक अशी जखमीं झालेल्याची नावे आहेत. यातील जखमी आणि मयत झालेले तरुण मंगळवारी सकाळी तुळजापूरला (एमएच १५ईएक्स ३२११) या बोलेरो वाहनातून सोलापूर ते तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सोलापूर आणि उस्मानाबादच्या सीमेवर बोलेरो वाहन पलटी होऊन अपघात झाला होता.

हेही वाचा: CAF Jawan Martyr in IED Blast : बिजापूरमध्ये आयईडी स्फोटात सीएएफ जवान शहीद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.