लातूर - शहरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या सोनी शेख या १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी 'इंस्टाग्राम' या सोशल मीडियावर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओनंतर तीने आत्महत्या केली.
मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा आंदाज
इंस्टाग्रामवरील या व्हिडिओमध्ये सोनी शेख ही रडत असून, ती मानसिक तणावात दिसत आहे. आपण हे जग सोडून जात असून, आपल्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नसल्याचे तिने म्हटले आहे. सोनी शेख ही लातूर शहरातील आनंदनगर भागात आपल्या आईसोबत राहत होती. आत्महत्येच्यावेळी ती घरात एकटीच होती. याप्रकरणी शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.एच.पाटील करत आहेत.
हेही वाचा - मोदीच पंतप्रधान होतील, आम्ही कुठं नाही म्हटलंय; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला