लातूर - गेल्या दोन दिवसांपासून खासदार रावसाहेब दानवे चर्चेत आहे. महाविकास आघाडी सरकार दोनच महिने सत्तेत राहील. सरकारला पाडण्याची आवश्यकता नाही, ते आपोआपच कोसळेल, असे भाकित त्यांनी केले होते. त्यानंतर आजही लातूरमध्ये त्यांची हात विश्वास कायम ठेवला आहे. शिवाय ईडी कोणाचीही चौकशी करू शकते. उद्या माझी चौकशीही होऊ शकते पण आम्ही काही गैर केलेच नाही. प्रताप सरनाईक यांनी काही गैरकारभार केले असतील, म्हणून चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला आहे, असे खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
पावसाने झालेले नुकसान पाहणी दरम्यान मुख्यमंत्री घराबाहेर पडले ते एक-दोन जिल्ह्यासाठीच. यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. शेत जमिनीच वाहून गेल्या आहेत, असे सांगताच तुमचे शेत तुमची जबाबदारी तर विनाअनुदानित शिक्षक यांनी त्यांचे प्रश्न मांडले तर तुमची नोकरी तुमची जबाबदारी असे म्हणून मुख्यमंत्र्यांनी हात झटकले असल्याचा आरोप यावेळी रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
लहान भाऊ- मोठा भाऊ असे काही नाही -
बिहार निवडणुकीत भाजपाला अधिक जागा मिळूनही मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार यांची वर्णी लागली आहे. मग महाराष्ट्रात अशी भूमिका का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे आणि पक्षाची काही धोरणे असतात ते देखील सांगायला ते विसरले नाहीत.