ETV Bharat / state

कंटेन्मेंट झोनसमोर मनपा कर्मचाऱ्यांचा पहारा; अत्यावश्यक सुविधा घरपोच

author img

By

Published : May 26, 2020, 2:36 PM IST

Updated : May 26, 2020, 8:50 PM IST

लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आठ दिवसांपूर्वी केवळ उदगीर शहरात रुग्ण होते. आता मात्र, सात तालुक्यात रुग्ण आढळून आलेले आहेत. पैकी लातूर महानगरपालिका हद्दीत 6 रुग्ण आहेत. यापैकी एमआयडीसी परिसरातील हाडको कॉलनीतील 5 तर लेबर कॉलनीतील एक आहे. त्यामुळे हे परिसर पूर्णतः सील करण्यात आले आहेत.

Latur corona update
लातूर कोरोना अपडेट

लातूर : उदगीर शहराबरोबर लातुरातही कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. मनपा हद्दीत 6 रुग्ण आढळले असून येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर शहरातील लेबर कॉलनी एमआयडीसी परिसरातील हाडको परिसर सील करण्यात आला आहे. 24 तास या ठिकाणी मनपाचे स्वछता अधिकारी आणि आशा वर्कर ठाण मांडून आहेत. अत्यावश्यक वस्तू या येथील नागिरीकांना घरपोच दिल्या जात आहेत.

लातूरमध्ये कंटेन्मेंट झोनसमोर मनपा कर्मचाऱ्यांचा पहारा

दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आठ दिवसांपूर्वी केवळ उदगीर शहरात रुग्ण होते. आता मात्र, सात तालुक्यात रुग्ण आढळून आलेले आहेत. पैकी लातूर महानगरपालिका हद्दीत 6 रुग्ण आहेत. यापैकी एमआयडीसी परिसरातील हाडको कॉलनीतील 5 तर लेबर कॉलनीतील एक आहे. त्यामुळे हे परिसर पूर्णतः सील करण्यात आले आहेत. हाडको कॉलनीत 129 घरे असून लोकसंख्या ही 629 एवढी आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा एक व्हाट्सएपचा ग्रुप बनविण्यात आला असुन नागरिकांना काही हवे असल्यास ते या ग्रुपवर मागणी करतात. मनपाचे अधिकारी त्यांना या सेवा घरपोच देत आहेत. याकरिता अधिकारी आणि कर्मचारी हे तीन शिफ्टमध्ये काम करीत आहेत. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात 56 रुग्णांवर उपचार सुरू असून उदगीर आणि लातूर शहरात कंटेन्मेंट झोन वाढविण्यात आले आहेत.

Last Updated : May 26, 2020, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.