ETV Bharat / state

विजेच्या धक्क्याने 18 मेंढ्यांच्या पिल्लांचा मृत्यू, एक लाखाचे नुकसान - लातूर जिल्हा बातमी

गावातील गोरोबा विठोबा काळे यांच्या शेतातील सर्वे नंबर १६० अ मध्ये कोकरे हे पिल्ली बसवून इतर मेंढरे चारण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी विद्युत प्रवाहाची तार तुटल्याने शॉक लागून 18 मेंढ्यांच्या पिल्ल्यांचा मृत्यू झाला.

latur
विजेच्या धक्क्याने 18 मेंढ्यांच्या पिल्लांचा मृत्यू
author img

By

Published : Mar 10, 2020, 9:24 AM IST

लातूर - निलंगा तालुक्यातील केळगाव येथे महावितरण विद्युत प्रवाहाची तार तुटून 18 मेंढ्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दिगंबर गणपती कोकरे या मेंढीपालन करणाऱ्या व्यक्तीची ही पिल्ली दगावली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील गोरोबा विठोबा काळे यांच्या शेतातील सर्वे नंबर १६० अ मध्ये कोकरे हे पिल्ली बसवून इतर मेंढरे चारण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी विद्युत प्रवाहाची तार तुटल्याने शॉक लागून 18 मेंढ्यांच्या पिल्ल्यांचा मृत्यू झाला आहे. यातील एका पिल्ल्याची किंमत 6 हजार रुपये असून या मेंढी पालकाचे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

विजेच्या धक्क्याने 18 मेंढ्यांच्या पिल्लांचा मृत्यू

हेही वाचा - कोरोनाची धास्ती: महाराष्ट्रात 'इथे' मिळतीये कपभर चहाच्या दरात कोंबडी...

याबात घटनेची माहिती वीज वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असता, सहाय्यक अभियंता एन. टी. लटपटे, प्रधान तंत्रज्ञ इबितवार दत्तात्रय, लाईनमन दामोदर गायकवाड यांनी घटनास्थळास भेट दिली. तसेच त्यांनी घटनेचा बुधवारी पंचनामा करतो, म्हणताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून तत्काळ नुकसानभरपाई महावितरणने न दिल्यास मृत पिल्ली महावितरण कार्यालयात टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हेही वाचा - धक्कादायक..! लातुरात चक्क केकमध्ये आढळला साप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.