ETV Bharat / state

पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय; जे गेले त्यांना घरीच बसविणार - शरद पवार

मराठवाडा दौऱ्यावर असलेले शरद पवार हे बुधवारी लातुरात दाखल झाले होते. लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Sep 18, 2019, 9:59 PM IST

Updated : Sep 18, 2019, 10:04 PM IST

लातूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लातूर येथील आयोजित कार्यकर्ता बैठकीमध्ये पक्ष सोडून गेलेल्यांचा चांगलाच समाचार घेतला. यापूर्वी 1980 साली 56 जण सोडून गेले होते. तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो आणि त्यांना घरीच बसविले होते. आता तुमची साथ असेल तर हे काम एका महिन्यातच करतो. पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय. यांनाही घरी बसविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे लातूर येथील भाषण

मराठवाडा दौऱ्यावर असलेले शरद पवार हे बुधवारी लातुरात दाखल झाले होते. शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीला सरकारच जबाबदार आहे. यांच्यामध्ये योग्य निर्णय घ्यायची क्षमता नसल्याने याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. वर्षभरात 6 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरात भटकत आहे. हे सरकारचे अपयश असून आता सत्ता परिवर्तनाची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - तुम्हाला कशी 'झक' मारायचीय ती मारा, शरद पवारांचा तोल सुटला

1980 साली मी परदेशातून परत आलो तेव्हा मला समजले होते की 58 पैकी 56 आमदार सोडून गेले होते. तेव्हा मी केवळ 5 जणांचा नेता होतो. तेव्हा मात्र राज्याचा कानाकोपरा पिंजून काढला आणि सोडून गेलेल्या एकालाही निवडून येऊ दिले नव्हते. आताही पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय. तुमची साथ असेल तर सोडून गेलेल्यापैकी एकालाही निवडून येऊ देत नाही. त्यांना घरीच बसविणार असल्याचा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी

राज्यात वर्षभरात 6 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारची आश्वासने हवेत विरत असून याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. ग्रामीण भागात तरुणांच्या हाताला काम नसल्याने शहराकडे तरुणांचा लोंढा वाढत आहे. त्यामुळे रोजगार आणि शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वसनात हे सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच वेळी 72 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. आता तसा निर्णय घेण्याची क्षमता नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - पाटील घराण्यावर टीका करताना पवारांचे अश्लील हावभाव

आता आमदार झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पक्ष सोडून गेल्यावर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी संपून जाईल असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनाही तुमचा जन्म ज्या गावात झाला त्यागावची ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे आहे. तुम्ही ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करता त्या परळी शहराची नगरपालिका आणि पंचायत समिती राष्ट्रवादीकडे आहे आणि आता आमदारकीही ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:पायाला भिंगरी बांधलीय...जे जे गेलेत त्यांना घरीच बसविणार : पवार
लातूर : लातूर येथील कार्यकर्ता बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला. यापूर्वी 1980 साली 56 जण सोडून गेले होते. तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो आणि त्यांना घरीच बसविले होते. आता तुमची साथ असेल तर हे काम एका महिन्यातच करतो. पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय यांनाही घरीच बसविल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या या वक्तव्याला दाद दिली.

Body:मरावड्याच्या दौऱ्यात असलेले शरद पवार हे आज लातुरात दाखल झाले होते. शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीला सरकारच जबाबदार आहे. यांच्यामध्ये योग्य निर्णय घ्यायची क्षमता नसल्याने याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. वर्षभरात 6 हजाराहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरात भटकत आहे... एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे दुष्काळ अशी भयावह स्थिती असताना सरकार सुस्त आहे. हे त्यांचे अपयश असून आता सत्ता परिवर्तनाची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. 1980 साली मी परदेशातून परत आलो तेव्हा मला समजले होते की 58 पैकी 56 आमदार सोडून गेले होते. तेव्हा मी केवळ 5 जणांचा नेता होतो. तेव्हा मात्र राज्याचा कानाकोपरा पिंजून काढला आणि सोडून गेलेल्या एकालाही निवडून येऊ दिले नव्हते. आता ही पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय तुमची साथ असेल तर सोडून गेलेल्यापैकी एकालाही निवडून येऊ देत नाही. त्यांना घरीच बसविणार असल्याचा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला. आता विकासासाठी पक्ष सोडलो असे संगणारे तेव्हा काय असे म्हणत त्यांनी हात इशारे करीत त्यांनी खिल्ली उडविली. नागपुरातील वाढते गुन्हे, किल्ल्यावर डान्सबार यासारख्या मुद्यावरून त्यांनी राज्यसरकाची पोलखोल केली. शिवाय अतिवृष्टी झालेल्या ठिकाणची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ हवाई सफर केली असून प्रत्यक्षात काहीच मदत केली नसल्याचे सांगितले.

Conclusion:बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी
राज्यात वर्षभरात 6 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारची आश्वासने हवेत विरत असून याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. ग्रामीण भागात तरुणांच्या हाताला काम नसल्याने शहराकडे तरुणांचा लोंढा वाढत आहे. त्यामुळे रोजगार आणि शेतकऱ्यांना दिलेल्या अश्वसनात हे सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच वेळी 72 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. आता तसा निर्णय घेण्याची क्षमता नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आता आमदार झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पक्ष सोडून गेल्यावर टीकास्त्र सोडले तर राष्ट्रवादी संपून जाईल असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनाही तुमचा जन्म ज्या गावात झाला त्यागावची ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे आहे. तुम्ही ज्या मतदार संघाचे नेतृत्व करता त्या परळी शहराची नगरपालिका आणि पंचायत समिती राष्ट्रवादीकडे आहे आणि आता आमदारकीही ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Last Updated : Sep 18, 2019, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.