ETV Bharat / state

तेव्हा पहिल्यांदा साहेबांना रडताना पाहिले - रितेश देशमुख

विलासराव देशमुख यांना ३ मुले नसून ५ मुले आहेत.

रितेश देशमुख
author img

By

Published : Feb 24, 2019, 3:34 PM IST

लातूर - येथील विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा लोकार्पण कार्यक्रमात रितेश देशमुख काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यांनी मात्र राजकीय वक्तव्य न करता वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना रितेश म्हणाला, की पहिल्यांदा मुख्यमंत्री पदावर रुजू होऊन जेव्हा विलासराव देशमुख लातूरला आले होते, त्यांनी येथेच मांजरा कारखान्यावर कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी माझे आजोबाही व्यासपीठावर होते. मुलाचे कर्तृत्व पाहून त्यांना आनंदाश्रू आवरले नाहीत आणि तेव्हाच मी साहेबांना रडताना पाहिले. त्यावेळेचे त्यांचे अश्रू आनंदाश्रू होते. आजही रोज त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसल्याचे त्यांनी सांगितले.

विलासराव देशमुख यांना ३ मुले नसून ५ मुले आहेत. लातूर आणि मांजरा कारखानाही त्यांचे मुले असल्याचे ते म्हणाले. शाळेत पहिले आलो नाहीत पण राज्यात हा कारखाना पहिला आला त्याचा अभिमान आहे. ही वास्तू पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. मांजरा परिवारामुळे दिवसेंदिवस कारभार वाढत आहे. याकरिता सर्वसामान्य जनतेची साथ लाभलेली आहे. आज या पूर्णाकृती पुतळ्याच्या रूपाने या परिसरात विठ्ठल अवतरले आहेत. असेच प्रेम कायम राहू देण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.

Intro:या बातमीचा व्हिडिओ मोजो मोबाईवरून पाठविला आहे.. reporter aap वरून बातमी सेंट होत नाही म्हणून येथे पाठविली आहे.

तेव्हा वडिलांना पहिल्यांदा रडताना पाहिले ; रितेश देशमुख
लातूर : येथील विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती कार्यक्रमात रितेश देशमुख काय बोलणार याकडे लक्ष लागले. त्यांनी मात्र राजकीय वाक्य न करता वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. पाहिल्यानदा मुख्यमंत्री पदावर रुजू होऊन जेव्हा विलासराव देशमुख लातूरला आले होते त्यांनी येथेच मांजरा कारखान्यावर कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी माझे आजोबाही व्यासपीठावर होते.मुलाचे कर्तृत्व पाहून त्यांना आनंदाश्रू आवरले नाहीत आणि तेव्हाच मी साहेबांना रडताना पाहिले परंतु ते आनंदाश्रू होते. आजही रोज त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Body:विलासराव देशमुख यांना 3 मुले हे खोटे तशी त्यांना 5 मुले आहेत त्यामध्ये मांजरा कारखाना याचा समावेश आहे. शाळेत पाहिले आलो नाहीत पण राज्यात हा कारखाना पहिला आला त्याचा अभिमान आहे. ही वास्तू पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. खरच नशीब लागते की विलासराव देशमुख यांचा मोठा भाऊ असण्याचे आणि सौभाग्य लागते दिलीप देशमुख यांच्यासारखा लहान भाऊ होण्यासाठी. आणि मी अमित देशमुख समोर लहान भावाची आणि धीरज देशमुख समोर मोठ्या भावाची भूमिका निभावत आहे. मांजरा परिवारामुळे दिवसेंदिवस कारभार वाढत आहे. याकरिता सर्वसामान्य जनतेची साथ लाभलेली आहे. आज या पूर्णाकृती पुतळ्याच्या रूपाने या परिसरात विठ्ठल अवतरले आहेत. Conclusion:असेच प्रेम कायम राहू देण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.