ETV Bharat / state

...म्हणून औस्यातील बंड झाले थंड!

औसा मतदारसंघाची उमेदवारी ही भूमिपुत्राला मिळावी यासाठी भाजपचे बजरंग जाधव आणि सेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी आंदोलन छेडले होते. पक्ष श्रेष्ठींच्या आदेशावरून माने यांनी माघार घेतली आहे.

युतीची पत्रकार परिषद
author img

By

Published : Oct 10, 2019, 12:59 AM IST

लातूर - राज्यभरात औसा मतदारसंघातील बंडखोरी चर्चेचा विषय बनला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी माघार घेतली. बंडखोरी केलेल्या माजी आमदारांनी माघार कशामुळे घेतली? याबाबतची उत्सुकता दिनकर माने यांनीच संपवली आहे.

औसा येथे पार पडली युतीची पत्रकार परिषद

औसा मतदारसंघ पुर्वीपासून शिवसेनेचा आहे. यामुळे उमेदवारीसाठी आग्रही होवून मी रस्त्यावर उतरलो. मात्र, शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश येताच माघार घेतली, असे माने यांनी स्पष्ट केले. औसा येथे पार पडलेल्या युतीच्या पत्रकार परिषदेत माने बोलत होते.

जिल्ह्यात महायुतीतील सर्व पक्ष एकत्र असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. मात्र, यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे अनुपस्थित होते. औसा मतदारसंघाची उमेदवारी ही भूमिपुत्राला मिळावी यासाठी भाजपचे बजरंग जाधव आणि सेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी आंदोलन छेडले होते. पक्ष श्रेष्ठींच्या आदेशावरून माने यांनी माघार घेतली आहे. आपला युतीच्या उमेदवराला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - देशमुख बंधू काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात ठरू शकतात प्रभावशाली?

पालकमंत्र्यांच्या नाराजीबद्दल जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांना विचारले असता, याबाबत वरिष्ठ नेत्यांना कळवले असून दोन दिवसात निर्णय होईल. महायुतीमधील सर्व एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार अभिमन्यू पवार, भाजप जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, पाशा पटेल, आरपीआयचे चंद्रकांत चिकटे, रासपचे दादा करपे यांची उपस्थिती होती.

Intro:Body:

ghjghjghjgh

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.