ETV Bharat / state

वास्तव लपवून मोदींनी देश बरबाद केला - राहुल गांधी - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

नोटाबंदी, जीएसटी यामुळे काळा पैसा बाहेर आला नाहीच. मात्र, लहान-मोठे उद्योग हातचे गेले. आता जनता हुशार झाली आहे. काँग्रेसची विचारधारा जनतेच्या मनामनात आहे. ती कुणी काढू शकत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय निश्चित आहे, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी, काँग्रेस माजी अध्यक्ष
author img

By

Published : Oct 13, 2019, 6:42 PM IST

लातूर - जमिनीवरील सत्यता वेगळीच आहे. मात्र, मोदी सरकारकडून हवेतील गप्पा मारून जनतेची फसवणूक केली जात आहे. बेरोजगारी, शेतीमालाचे दर, कर्जमाफीची अंमलबजावणी यासारख्या समस्यांमध्ये सर्वसामान्य जनता गुरफटून गेली असताना मोदी सरकारकडून चंद्रावरच्या गप्पा मारल्या जात आहेत. त्यामुळे युवकांच्या हाताला काम मिळणार आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

रविवारी औसा येथील उमेदवार बसवराज पाटील तसेच जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधीनी महाराष्ट्रातील पहिली सभा औसा मतदारसंघात घेतली. वेगळ्या अंदाजमध्ये राहुल गांधी यांनी भाषणाला सुरुवात केली.

राहुल गांधी, काँग्रेस माजी अध्यक्ष

हेही वाचा - काँग्रेस-राष्ट्रवादी चोर तर भाजपा हा संघटित डाकू- प्रकाश आंबेडकर

यावेळी गांधी म्हणाले, रोजगार मिळाला का? शेतीमालाला दर मिळाला का? कर्ज माफ झाले का? असे प्रश्न जनतेला विचारत त्यांनी वास्तवता समोर आणली. मोदी सरकारने शेतकऱ्यांची नाही पण मीडियातील काही लोकांची तब्बल लाखो रुपयांचे कर्ज माफ केले. त्यामुळे देशातील वास्तव बाजूला राहत असून हवेतील गप्पा समोर आणल्या जात आहेत. अशीच स्थिती कायम राहिली तर आगामी 6 महिन्यात देशाचे वाटोळे होईल आणि याला मोदी सरकार जबाबदार असेल. नोटाबंदी, जीएसटी यामुळे काळा पैसा बाहेर आला नाहीच उलट लहान-मोठे उद्योग हातचे गेले. पण, आता जनता हुशार झाली आहे. काँग्रेसची विचारधारा जनतेच्या मनामनात आहे. ती कुणी काढू शकत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय निश्चित आहे, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - भरधाव दुचाकी झाडावर आदळून एक ठार

पुढचा मुख्यमंत्री आमचाच - अशोक चव्हाण

आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना फसवले. आम्ही फसवणार नाही. सध्याच्या सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. त्यामुळे महाराष्ट्र आता आपल्या हातातून जाऊ देऊ नका, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

फडणवीस सरकार नाही, फसवणूक सरकार - थोरात

विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्ममुक्त केले नाही. बेरोजगारी वाढवली, कारखाने बंद केले. त्यामुळे कुठलाच घटक समाधानी नाही. या सरकारला जनता नाकारेल. हे फडणवीस सरकार नाही, तर फसवणूक सरकार आहे, असे थोरात बाळासाहेब थोरात म्हणाले.

यावेळी माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लीकार्जून खर्गे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख, बसवराज पाटील-मुरूमकर, राजीव सातव, मधुकरराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Intro:वास्तवता लपवून मोदींनी देश बरबाद केला : राहुल गांधी
लातूर : जमिनीवरील सत्यता वेगळीच आहे..मात्र, मोदी सरकारकडून हवेतील गप्पा मारून जनतेची फसवणूक केली जात आहे. बेरोजगारी, शेतीमालाचे दर, कर्जमाफीची अंमलबजावणी यासारख्या समस्यांमध्ये सर्वसामान्य जनता गुरफटून गेली असताना मोदी सरकारकडून चांद्रवरच्या गप्पा मारल्या जात आहेत. यामुळे काय युवकांच्या हाताला काम मिळणार आहे काय असा सवाल खा. राहुल गांधी यांनी उपस्थित केला. शिवाय देशातील मीडिया मोदी चालवीत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
Body:रविवारी औसा येथील उमेदवार बसवराज पाटील तसेच जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी आज महाराष्ट्रातील पहिली सभा औसा मतदारसंघात घेतली. वेगळ्या अंदाजमध्ये राहुल गांधी यांनी भाषणाला सुरवात केली... रोजगार मिळाला का... शेतीमालाला दर मिळाला का.... कर्ज माफ झाले का असे प्रश्न जनतेला विचारत त्यांनी वास्तवता समोर आणली. मोदी सरकारने शेतकऱ्यांची नाही पण मीडियातील काही लोकांची तब्बल लाखो रुपयांचे कर्ज माफ केले. त्यामुळे देशातील वास्तव बाजूला राहत असून हवेतील गप्पा समोर आणल्या जात आहेत. अशीच स्थिती कायम राहिली तर आगामी 6 महिन्यात देशाचे वाटोळे होईल आणि याला मोदी सरकार जबाबदार असेल. नोटा बंदी, जीएसटी यामुळे काळा पैसा बाहेर आला तर नाहीच लहानमोठे उद्योग हातचे गेले आहेत. पण आता जनता हुशार झाली आहे. काँग्रेसची विचारधारा जनतेच्या मनामनात आहे. ती कुणी काढू शकत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय निश्चित आहे. येथील उमेदवार बसवराज पाटील जे बोलतात ते करतात. त्यामुळे विकास अखंडित सुरू ठेवण्यासाठी त्यांना साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लीकार्जून खर्गे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख, बसवराज पाटील-मुरूमकर, राजीव सातव, मधुकरराव चव्हाण आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.Conclusion:पुढचा मुख्यमंत्री आमचाच
आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी देणार. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना फसवले. आम्ही फसवणार नाही. सध्याच्या सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. त्यामुळे महाराष्ट्र आता आपल्या हातातून जाऊ देऊ नका, असे चव्हाण यांनी सांगितले. थोरात म्हणाले, हे फडणवीस सरकार नाही; फसवणूक सरकार आहे. विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्ममुक्त केले नाही. बेरोजगारी वाढवली, कारखाने बंद केले. त्यामुळे कुठलाच घटक समाधानी नाही. या सरकारला जनता नाकारेल. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री आमचाच राहिल.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.