ETV Bharat / state

निलंग्यात मुस्लीम बांधवांकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध - muslim community

आज जिल्ह्यातील निलंग्यामध्ये मुस्लीम समाज बांधवांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला.

लातूरात निषेध
author img

By

Published : Feb 15, 2019, 10:41 PM IST

लातूर - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. आज जिल्ह्यातील निलंग्यामध्ये मुस्लीम समाज बांधवांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला. यावेळी भारत मातेचा जयघोष करण्यात आला, तर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोरक्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

या आत्मघाती हल्ल्यात ४५ जवानांना वीरमरण आले असून त्याचे पडसाद आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहेत. शुक्रवारची नमाज अदा करून मुस्लीम बांधवांनी शिवाजी चौकामध्ये एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला.
यावेळी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निलंग्यातील मुस्लीम बांधवांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या.

Intro:निलंग्यात मुस्लिम बांधवांकडून 'त्या' घटनेचा निषेध
लातूर - जम्मू-काश्मिर येथे आतेरिक्यांनी केलेल्या हल्लयाचा देशभर निषेध होत असताना जिल्ह्यातील निलंगा येथे मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला. यावेळी भारत मातेच्या जयघोष करण्यात आला तर जैश-ए-मोहम्मद याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
Body:देशात सर्वत्र अतिरेक्यांच्या हल्लयाचा निषेध केला जात आहे. या आत्मघाती हल्लयात ४४ जवान शहीद झाले असून त्याचे पडसाद आता ग्रामीण भागापर्यंतही पोहचले आहे. शुक्रवारची नमाज अदा करून निलंगा येथील मुस्लिम बांधवांनी शिवाजी चौकामध्ये एकत्र येऊन घटनेचा निषेध व्यक्त केला. तर जैश-ए-मोहम्मदच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.Conclusion: यावेळी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत निलंगा येथील मुस्लिम बांधवांनी पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.