ETV Bharat / state

'सिटी स्कॅन' शासकीय रुग्णालयात मोफत; मात्र खासगी रुग्णालयात सोयीनुसार आकारली जाते रक्कम - latur corona patients

लातूर शहरात वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर 7 खासगी ठिकाणी ही तपासणी करण्याची सुविधा आहे. कोविड रुग्ण असेल तर शासकीय रुग्णालयात याची मोफत तपासणी केली जाते. परंतु, खासगी रूग्णालयात या चाचणीसाठी हजारो रुपये आकारले जातात.

private hospitals charging more money for city scan in latur
लातूर
author img

By

Published : Aug 18, 2020, 3:06 PM IST

Updated : Aug 20, 2020, 8:39 PM IST

लातूर - दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना त्याचे निदान होण्यासाठी आता सिटी स्कॅनद्वारे तपासणीही वाढत आहे. शासकीय रुग्णालयातील गर्दी शिवाय रुग्ण सोईनुसार खासगी सेंटरमध्ये याची तपासणी करून घेत आहेत. तर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णांसाठी ही चाचणी मोफत असली तरी खासगी रुग्णालयात मनमानी कारभार सुरू आहे. 'ईटीव्ही भारत'ने याचा आढावा घेतला असता शहरातील सेंटरमध्ये 4 हजार रुपयांपासून 6 हजारपर्यंतचे दर आकारले जात आहेत. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र लातुरात आहे.

'सिटी स्कॅन' शासकीय रुग्णालयात मोफत; मात्र खासगी रुग्णालयात सोयीनुसार आकारली जाते रक्कम
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यातच कोरोना चाचणीसाठीच्या प्रक्रियेत वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत. कोरोना चाचणी सातत्याने निगेटीव्ह येत असेल आणि रुग्णाचा आजार गंभीर असेल तर सिटी स्कॅन करून निदान केले जाते. लातूर शहरात वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर 7 खासगी ठिकाणी ही तपासणी करण्याची सुविधा आहे. कोविड रुग्ण असेल तर शासकीय रुग्णालयात याची मोफत तपासणी केली जाते. परंतु, खासगी रूग्णालयात या चाचणीसाठी हजारो रुपये आकारले जातात. यासंदर्भात शहरातील 4 सिटी स्कॅन सेंटरमध्ये चौकशी केली असता कुठे 4 हजार तर कुठे साडेचार तर काही ठिकाणी 6 हजार रुपये आकारले जात आहेत. यामध्ये पीपीई किट आणि इतर सामग्रीची रक्कम आकारली जात आहे. एकीकडे खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू झाल्यापासून अनामत रक्कम तसेच उपचारावरून वाद निर्माण झाले आहेत. आता सिटी स्कॅनसाठीही अधिकची रक्कम आकारली जात आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही रुग्णांना खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन तपासणी करण्यास सांगितले जाते. तर काही रुग्ण स्वतःहून खासगी रुग्णालयाची पायरी चढतात. मात्र, यावर जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेचे नियंत्रण नाही. अवास्तव रक्कम आकारल्यास कारवाई केली जाणार असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे. मात्र, अद्याप तरी कोणत्याच केंद्रावर कोणतीही कारवाई झालेली नाही. कोरोनाचे निदान करण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. तर खासगी रुग्णालयातील उपचाराची रक्कम लाखोंच्या घरात जात आहे. दुसरीकडे आता सिटी स्कॅनचे वास्तव समोर येऊ लागले आहे. त्यामुळे यावर अंकुश आणण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

Last Updated : Aug 20, 2020, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.