लातूर - जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणाऱ्या दोघांना अहमदपूर पोलिसांनी अटक केली आहे. या शिक्षकाकडून तब्बल २० लाखाची खंडणी मागितली असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा... आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले; ग्राहकांना दिलासा, तर शेतकरी हवालदिल
या घटनेबाबत लातूरमधील थोडगे गावचे सरपंच शिवाजी खांडेकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. ज्यात त्यांचे नातेवाईक असलेल्या शिक्षकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. पोलिसांच्या तपासा दरम्यान, राजू जाधव व एका महिलेकडून शिक्षकाला धमकावले जात असल्याचे, समोर आले.
हेही वाचा... औरंगाबादमार्गे नागपूरला जाणार बुलेट ट्रेन? चाचपणीला सुरुवात
अश्लील व्हिडिओ व्हायरल न करता प्रकरण निकाली काढण्यासाठी या शिक्षकाकडून २० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे या शिक्षकाने हे सर्व प्रकरण त्यांचे नातेवाईक आणि सरपंच असलेल्या शिवाजी खांडेकर यांच्या कानावर घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. टेंभूर्णी रोडवरील शाळेच्या मागच्या मैदानावर हे पैसे देण्याचे ठरले होते. यावेळी पोलिसांनी शिक्षकाकडून पैसे स्वीकारताना राजू जाधव आणि त्या महिलेला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी अश्विनी शेलार अधिक तपास करत आहेत.