ETV Bharat / state

गावात येणाऱ्यांचा मुक्काम शेतावरच; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा ठराव - कोरोना विषाणू न्यूज

मुख्य शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात कामासाठी गेलेल्या नागरिकांनी गाव जवळ करणे पसंत केले आहे. अशा नागरिकांना गावात घेतले जाईल मात्र, त्यांची तपासणी करून त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांचा मुक्काम हा शेतात असणार आहे, असा ठराव लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली गावतील नागरिकांनी केला आहे.

Latur Corona Update
लातूर कोरोना न्यूज
author img

By

Published : Mar 24, 2020, 7:56 PM IST

लातूर - कोरोनाच्या धास्तीने पुण्या-मुंबईहून गावांकडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिसे वाघोली या गावातील रहिवाशांनी यावर एक उपाय शोधून काढला आहे. या गावात परजिल्ह्यातून येणाऱ्यांची रवानगी थेट शेतामध्ये केली जाणार आहे. याबाबतचा ठरावही घेण्यात आला आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह येऊपर्यंत अशा नागरिकांना शेतातच ठेवण्यात येणार आहे.

गावात येणाऱ्यांचा मुक्काम शेतावरच

मुख्य शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात कामासाठी गेलेल्या नागरिकांनी गाव जवळ करणे पसंत केले आहे. अशा नागरिकांना गावात घेतले जाईल मात्र, त्यांची तपासणी करून त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांचा मुक्काम हा शेतात असणार आहे. शेतात या नागरिकांची सोयही करण्यात आली असल्याचे भिसे वाघोली गावातील नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा - COVID-19 LIVE : आवश्यक असेल तिथे कर्फ्यू लागू करा, केंद्राचे राज्यांना निर्देश..

२२ मार्चपर्यंत लातूर जिल्ह्यात १८ हजार नागरिक हे पुण्या-मुंबईहून परतले आहेत. यातील केवळ ५५ जणांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी केली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भिसे वाघोली येथील ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाचे अधिकारीही गावात ठाण मांडून आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.