लातूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, दारुविक्रीला बंदी असतानाही रेणापूर तालुक्यातील शेरा गावच्या सरपंचांनी लातूरच्या काही नागरिकांना घेऊन शेतात जंंगी पार्टी केली. या पार्टीचा व्हिडिओ एका नागरिकाने बनवला आहे. सध्या तो परिसरात सर्वत्र व्हायरल होत आहे. व्यक्तीच्या मुलाला मारहाण झाल्याचेही तो व्यत्ती आरोप करीत आहे.
हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात?...
संचारबंदी असली तरी ग्रामीण भागातील शेतशिवारात सध्या चिकन, मटनाचे बेत रंगत आहेत. असाच प्रकार रेणापूर तालुक्यातील एका गावाच्या शिवारात सुरू होता. दारू, मटण, चिकन असा बेत सुरू असताना, मुलाला मारहाण केल्याचा राग मनात धरत एका शेतकऱ्याने व्हिडिओ केला आणि पार्टीचा रंग बेरंग केला. गेल्या काही दिवसांपासून गावचे सरपंच आणि उपसरपंच हे लातूरमधील काही नागरिकांना घेऊन येतात. जमावबंदीच्या आदेशाचे पालन न करता येथे एकत्र येत पार्टी केली जात असल्याचा आरोप सुग्रीव भुरे या शेतकऱ्याने केला.
येथील पार्टीचा व्हिडिओ त्याने तयार करुन सोशल मीडियावर टाकला. यानंतर लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनीही याची दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.