निलंगा(लातूर)- दारूचे आमिष दाखवत मुक्तार पांढरे याला गावाजवळील स्मशानभूमी मध्ये नेत रबरी पाईपने मारहाण गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील केळगाव येथे घडली आहे. मुक्तार पांढरे यांनी या प्रकरणी ईलाही हैदरसाब डाळींबकर विरोधात निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
निलंगा पोलिसांनी या प्रकरणाबाबत दिलेली माहिती अशी की निलंगा तालुक्यातील केळगाव येथील ईलाही हैदरसाब डाळींबकर याने मित्र मुक्तार बशीर पांढरे यास गावाजवळ असलेल्या स्मशानभूमी मध्ये दारुचे आमिष दाखवत नेले. पांढरे याला स्मशानभूमीत नेऊन रबरी पाईपने डाळींबकर याने मारहाण केली. डोक्यात दगड घालत डोके फोडले, हाता पायावर मारहाण करत जखमी केले, अशी तक्रार पांढरे याने पोलिसांत दिली आहे.
हेही वाचा-रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना पोलीस ईडी कार्यालयात घेऊन गेले
डाळींबकर मारहण करत असल्याचे पाहून मुलगी नाजीया व गावातील शाहरूख शेख व नवाब पांढरे यांनी वाचवले. त्यामुळे जीव वाचला असे जखमी मुक्तार पांढरे यांनी पोलिसांना सांगितले आहे. डाळींबकने जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद निलंगा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून त्यानुसार ईलाही हैदरसाब डाळींबकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल चोरमले करत आहेत