ETV Bharat / state

लातूर : जिल्हा परिषदेच्या परिचर कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप - लातूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा संप

जिल्हा परिषदेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांबाबत सरकार सकारात्मक नाही. शिवाय नौकारीमध्ये जाचक अटी लादल्याने कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे विविध मागण्या घेऊन शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या समोर या कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप केला आहे.

one-day-symbolic-strike-of-zilla-parishad-employe-in-latur
लातूर : जिल्हा परिषदेच्या परिचर कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप
author img

By

Published : Jan 29, 2021, 3:19 PM IST

लातूर - लातूरमध्ये जिल्हा परिषदेचे चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची संख्या ही 700 एवढी आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. शिवाय नौकारीमध्ये जाचक अटी लादल्याने कर्मचाऱ्यांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याविरोधात शुक्रवारी या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक संप केला.

कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या -

इतर विभागातील सरकारी वर्ग 4 परिचरप्रमाणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळावेत, वर्ग 4 वरून 3 मध्ये पदोन्नती देण्याबाबत ग्रामविकास विभागाचे सुधारित सेवा प्रवेश नियम तत्काळ निर्गमित करावेत, चतुर्थ श्रेणीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यास विना अट सेवेत घ्यावे, सातव्या वेतन आयोगामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे निश्चित केलेले मूळ वेतन 15000 ऐवजी केंद्राप्रमाणे 18 हजार करण्यात यावे, पंचायत समिती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी चौकीदार पदे निर्माण करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

प्रशासनाविरोधात घोषणाबाजी -

येथील जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला. शिवाय मागण्या मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदार सोमवंशी, बालाजी जगताप, नितीन सागर, स्वाती चिंचकर, भीमराव कांबळे, राहुल गवळी यांच्यासह चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.

आंदोलनाचा तिसरा दिवस -

जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले आहे. 27 जानेवारी रोजी निदर्शने करण्यात आली, तर 28 जानेवारी रोजी या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. शुक्रवारी लाक्षणिक संप पुकारला आहे. वेगवेगळ्या 15 मागण्या शासन दरबारी या कर्मचाऱ्यांनी मांडल्या आहेत.

हेही वाचा - रेल्वे अर्थसंकल्प: हक्काची रेल्वे पुन्हा सर्वसामान्यांना घेऊन कधी धावणार? नागपूरकरांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.