ETV Bharat / state

Maharashtra Government on Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनाचा दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर - लता मंगेशकर निधन दुखवटा

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे. त्या 92 वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी ( Breach Candy Hospital Mumbai ) रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.

Maharashtra Government on Lata Mangeshkar
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा
author img

By

Published : Feb 6, 2022, 4:14 PM IST

Updated : Feb 6, 2022, 7:07 PM IST

मुंबई - गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे. त्या 92 वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी ( Breach Candy Hospital Mumbai ) रुग्णालयात उपचार सुरू होते. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

अधिसूचनेत काय?

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

लतादीदींनी हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी मुख्यत्वे हिंदी, मराठी आणि बंगालीमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी 36 पेक्षा अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. (Lata Mangeshkar Awards) हे एक संगीत क्षेत्रातील रेकॉर्ड आहे.

देशातही दोन दिवसांचा शोक -

पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोकमग्न वातावरण आहे. भारत सरकारकडून लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवस राष्ट्रीय शोकची घोषणा केली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, यादरम्यान, राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर राहील तसेच त्यांच्यावरील अंतिम संस्कार शासकीय इतमामात केले जातील.

हेही वाचा - Lata Mangeshkar Funeral Update : शिवाजी पार्कवर होणार लतादीदींच्या पार्थिवावर अत्यसंस्कार; जाणून घ्या ताजे अपडेट

Last Updated : Feb 6, 2022, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.