लातूर - उस्मानाबाद आणि लातूर लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांचा प्रचारार्थ आज लातूरमधील औसा येथे सभा घेण्यात येत आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकाच मंचावर असणार आहेत.
या दोन्ही मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेने विद्यमान खासदारांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. लातुरातून भाजपचे सुधाकर शृंगारे तर उस्मानाबाद मतदारसंघातून सेनेचे ओमप्रकाश निंबाळकर आपले नशीब आजमावत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र असल्याची ही गर्दी आहे. लातूर आणि उस्मानाबाद आता या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून द्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला भुईसपाट करा.
फडणवीस म्हणाले..
- ही दिल्लीची निवडणूक गल्लीची नाही. त्यामुळे मोदींजींचे हात बळकट करा.
- ५ वर्षांमध्ये जे बदल झाले, ते कायम ठेवण्यासाठी या अस्मितेच्या निवडणुकीत साथ द्या
- काँग्रेस पुन्हा गरिबी हाईवण्याचा नारा दिला. राहुलबाबा तुमच्या आजोबा, आजी आणि आईनेही हा नारा दिला पण यशस्वी झाला नाही.
- काय खाऊन ही गरिबी हटवण्याचा नारा देतात तुम्ही
- विरोधकांचे भाषण म्हणजे काल्पनिक आणि वास्तवतेशी याचा काहीही संबंध नाही अशी अवस्था
- गरिबांना ७२ हजार कोठून देणार.
- राष्ट्रवादीच्या कर्णधाराने माघार घएतली हे दुर्दैव्य
- पीकविमा, कर्जमाफी यांची अमलबाजवणी होणारच.
- हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार.
- मराठवाड्याचे पाणी राष्ट्रवादी काँग्रेसने पळवून नेले
- होय आज दुष्काळ आहे, पण या दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
पंतप्रधान मोदी म्हणाले..
- नरेंद्र मोदींनी उध्दव ठाकरेंचा 'छोटा भाऊ' म्हणून केला उल्लेख
- चौकादाराची ५ वर्षाची कमाई म्हणजे विश्वास
- सशक्त भारत बनवण्याचा संकल्प
- नव्या भारताच्या निर्माणासाठी तुमची साथ हवी
- दहशतवाद्यांच्या अड्यात घूसुन मारु
- जम्मू कश्मीरमध्ये राष्ट्रवाद जागृत केला
- जी भाषा पाकिस्तान बोलतोय तीच भाषा पाकिस्तानची
- देशद्रोहाचा कायदा नष्ट करायला काँग्रेस निघाली आहे, आणि हेच पाकिस्तानला हवे
- काँग्रेसने आरशात आपले तोंड पहावे
- काँग्रेसच्या तोंडात मानव अधिकाराची भाषा शोभत नाही.
- काँग्रेसकडून अपेक्षा नाही, शरद पवार तुम्हाला काँग्रेस सोबत राहणे शोभत नाही
- ज्यांचा जवानावर विश्वास नाही, त्यांना धडा शिकवण्याची गरज
- देशाच्या हितासाठी सर्व निर्णय घएतले जात आहेत.
- २०२२ पर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करणार
- निवडणुकीनंतर रालोआ सरकार निवृत्ती योजना आणणार
- शेतकऱ्यांना किसान योजनेचा लाभ
- ६० वर्षानंतर निवृत्त झाले नाही तरी शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणार
- काँग्रेसने शेतकऱ्यांच्या गरजा पाहिल्याच नाहीत
- आमचा संकल्पपत्र त्यांचा 'ढकोसलापत्र'
- आमच्या घोषणा पत्रात सर्जिकल स्ट्राईक नव्हतं पण आम्ही केलं
- २०२२ पर्यंत सर्वांना घर देणार
- पुढील युद्ध पाण्यासाठी होईल, हे टाळण्यासाठी प्रयत्न करणार यासाठी स्वतंत्र मंत्रालय
- आमचा संकल्प मतांसाठी नाही तर मतदारांसाठी
- पहिल्यांदा मतदान करणाऱयांनो आपले पहिले मत पुलवामातील शहिदांच्या नावाने द्या
- ते मागील ६ महिण्यापासून चौकीदीर चौर है, म्हणत होते पण पैसे कुठून मिळाले
- पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनो आपले पहिले मत पुलवामातील शहिदांच्या नावाने द्या