ETV Bharat / state

वडिलांनीच मला देव्हाऱ्यातील काडीपेटीने पेटवले; लातुरातील पीडितेचा खळबळजनक खुलासा - तरूणीला जाळले लातूर बातमी

शहरातील दिपज्योती नगरमधील एक तरुणी घरात जळाली होती. स्टोव्हच्या भडक्यात ही घटना झाल्याची तरुणीने सुरुवातीला माहिती दिली होती. मात्र, वडिलांच्या दबावामुळे मी खोटी माहिती दिली असून वडिलांनीच मला जाळले असल्याची धक्कादायक माहिती आता तरुणीने दिली आहे.

my-father-burned-me-says-this-girl-in-latur

author img

By

Published : Feb 15, 2020, 11:37 PM IST

लातूर- शहरातील दिपज्योती नगरमधील एक तरुणी घरात जळाली होती. स्टोव्हच्या भडक्याने ही घटना घडल्याचे तरुणीने सुरुवातीला सांगतिले होते. मात्र, वडिलांच्या दबावामुळे मी खोटी माहिती दिली असून वडिलांनीच मला देव्हाऱ्यातील काडीपेटीने पेटविली असल्याची खळबळजनक माहिती आता पीडित तरुणीने दिली आहे.

देव्हाऱ्यातील काडीपेटीने मला पेटवले...

हेही वाचा- 'शेतकऱ्यांना सात-बारा घेऊन फिरण्याची गरज नाही, ऑनलाइन सात-बारा ग्राह्य ठरेल'

घटनेच्या दिवशी तरुणी घरात एकटीच होती. दरम्यान, तिचे वडील दारू पिऊन आले. तुम्ही दारू का पिता असे तरुणीने त्यांना विचारले. याचा राग धरुन वडिलांनी तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर डोक्यावर रॉकेल ओतून तिला पेटवले. याबाबत बाहेर कोणालाच न सांगण्याची धमकीही तरुणीला वडिलांनी दिली होती, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.